Today Panchang आजचे पंचांग १७ नोव्हेंबर २०२२ : राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Nov 2022, 7:29 am

Daily Panchang : गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर २६ कार्तिक शके १९४४, कार्तिक कृष्ण अष्टमी सकाळी ७-५६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा रात्री ९-१९ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: विशाखा,

 

आजचे पंचांग १७ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रीय मिति कार्तिक २६, शक संवत् १९४४, कार्तिक कृष्ण, अष्टमी, गुरुवार, विक्रम संवत् २०७९ सौर कार्तिक मास प्रविष्टे ०२,रवि-उल्सानी-२१, हिजरी १४४४(मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १७ नोव्हेंबर २०२२. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, हेमन्त ऋतु.

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. अष्टमी तिथी सकाळी ०७ वाजून ५६ मिनिटे त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र रात्री ०९ वाजून २० मिनिटे त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ.

ऐन्द्र योग अर्धरात्रौ ०१ वाजून २३ मिनिटे त्यानंतर वैधृती योगाला प्रारंभ. कौलव करण सकाळी ०७ वाजून ५७ मिनिटे त्यानंतर गर करणाला प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संक्रमण करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-४८,

सूर्यास्त:

सायं. ५-५९,

चंद्रोदय:

उत्तररात्री १-२३,

चंद्रास्त:

दुपारी १-३९,

पूर्ण भरती:

सकाळी ६-०१ पाण्याची उंची ३.४७ मीटर, सायं. ६-२४ पाण्याची उंची २.७८ मीटर,

पूर्ण ओहोटी:

दुपारी १-०३ पाण्याची उंची २.२० मीटर, रात्री १२-२८ पाण्याची उंची २.१६ मीटर.

दिनविशेष:

शुक्राचे सायं. पश्चिमेस दर्शन.

आजचा शुभ मुहूर्त

विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे ते ०२ वाजून ३६ मिनिटे. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४० मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे. गोधूली बेला सायं ०५ वाजून २७ मिनिटे ते ०५ वाजून ५३ मिनिटे. अमृत काळ सायं. ०६ वाजून ४३ मिनिटे ते ०८ वाजून २८ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलीक काळ राहील. सकाळी ०६ वाजेपासून ते ०७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुमूहर्त काळ सकाळी १० वाजून १९ मिनिटे ते ११ वाजून ०२ मिनिटापर्यंत. त्यानंतर ०२ वाजून ३६ मिनिटे ते ०३ वाजून १८ मिनिटापर्यंत.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

daily astrologypanchang in marathirahukalshubh muhurta and shubh yogtoday panchang 17 november 2022आजचे पंचांग १७ नोव्हेंबर २०२२राहूकाळशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment