तब्बल १७ तासानंतर भायखळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली धीमी लोकल रवाना झाली. दादर ते भायखळा दरम्यान सर्व स्थानकांवर उद्घोषणा करण्यात आल्याने सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ब्लॉक कालावधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ठाणे लोकल दुपारी ३.५० मिनिटांनी सोडण्यात आलेली आहे. ही लोकल कर्नाक पूलाजवळ ४ वाजता पोहोचली.
भाजपनं ४२ आमदारांना घरी पाठवलं, पहिल्या टप्प्यात ७ नेत्यांची बंडखोरी, प्रदेशाध्यक्षांकडून मोठी कारवाई
रेल्वेचं नियोजन कसं होतं
– कर्नाक पुलाच्या स्टीलच्या सांगाड्याची लांबी – ५० मीटर आणि रुंदी -१८.८ मीटर
– सांगाड्यात एकूण ७ स्पॅन होते.
– या स्पॅनचे ४४ तुकडे करण्यात आले.
– एकावेळी एकच तुकडा उचलण्यात आला .
– १८ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १६ टन
– १४ तुकड्यांचे प्रत्येकी वजन ३ टन
-१२ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १० टन
– ३५० टन वजनी क्षमतेच्या ३ क्रेन
– ५०० टन वजनी क्षमतेची एक क्रेन
ब्लॉकच्या पहिल्या आठ तासानंतर पुलाच्या सांगाड्याचा मधला भाग पूर्णपणे हटवण्यात आला होता.
मोठ्या मनाचे टाटा! मेटा, ट्विटरनं नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; टाटांनी माणुसकी जपली
हार्बर लाईन ८ वाजेपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न
रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार ४ वाजता मुख्य लाईन सुरु करण्यात आली आहे. तर, हार्बर लाईन ८ वाजता सुरु करण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न आहे. तर, यार्ड मार्गिका मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु करण्यात येईल.
सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, एका सामन्यात असे दोन विक्रम करणारा बनला पहिला खेळाडू