शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची नांदी, ठाकरेंनी साद घालताच आंबेडकरांनी टायमिंग सांगितलं

मुंबई : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. प्रबोधनकार या वेबसाईटच्या रीलाँचिंगच्या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले होते. आज आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. पण, फक्त लोकांना जागं करुन उपयोग नाही, लोकांना जागं करुन सोडणार असू तर आपण काम न केलेलं बर आणि ते करणार नसू तर आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. वेळ आलेली आहे, पुढे कोण जाणार, दोघांनीही पुढे जाऊया असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या स्वांतत्र्याचं ७५ वर्ष आहे. आपण राज्यघटनेप्रमाणं कारभार होतोय का? त्याप्रमाण राज्यकारभार करणार आहोत की नाही,असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आता आभासी कारभार सुरु आहे. भारताचा वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्यानंतर एक चित्र व्हायरल होत होतं. त्यात एक व्यक्ती तुम्हाला याच्यापेक्षा मोठा कप देतो, असं म्हणत असल्याचा उल्लेख होता. देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या व्यवस्थांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदारांच्या जीवावर सरकार उभं असतं. मतदारांच्या जनजागृतीचं काम आपल्याला करावे लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, ४७ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ५० जण जखमी?

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
आम्ही एकत्र कधी येणार हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. निवडणूक कधी होणार यावर अवलंबून आहे. निवडणूक ताबडतोब होणार असेल तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येणार का यासंदर्भात चर्चांना सुरुवात झाली आहे.

जत्रेत आकाश पाळणा हवेतच तुटला अन् वीजेच्या हायटेंशन वायरवर पडला, मग…

शिवसेना ठाकरे गट- वंचितची युती होणार?
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि आरपीआयचे रामदास आठवले यांच्यात यापूर्वी शिवसेना आणि आरपीआय युतीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला होता. आता पुन्हा एकदा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात शिवशक्ती-भीमशक्ती युतीचा दुसरा भाग बघायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची गोलमाल उत्तरं, पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न

Source link

Prakash Ambedkarsanay rautshinde factionShivsenaSubhash DesaiUddhav Thackerayउद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरसंजय राऊतसुभाष देसाई
Comments (0)
Add Comment