चॅनेलमधल्या मुली साडी का नेसत नाही? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून वाद, चित्रा वाघ बोलल्या…

पिंपरी, पुणे : टिकली लावली तरच मी बोलेन, असं म्हटल्याने संभाजी भिडे म्हणजे भिडे गुरुजी वादात आले होते. त्यांच्यावर महिला संघटनांसह समाजातून आणि राजकीय क्षेत्रातून जोरदार टीका झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साडीबाबत पुण्यात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

न्यूज चॅनलमधील मुली साडी का नेसत नाहीत, मराठी भाषा बोलता ना, मग मराठी संस्कृती सारखे कपडे का घालत नाहीत, केवळ दिवाळीत तयार होऊन येता, नियम फक्त आम्हालाच का? फॅशन आयकॉन तुम्ही नाहीत आणि आम्ही नाहीत असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. न्यूज चॅनलमधील मुलींच्या ड्रेसबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..?
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !, चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी याच ट्विटमध्ये हिंदीतूनही नमूद केलं आहे.

राज्यपाल कोश्यारींविरोधात राष्ट्रवादीचे खळबळजनक बॅनर, पुण्यात वातावरण तापण्याची

बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाले “साड़ी” पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड़ देंगे क्या..? चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये , असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

#MataSuperWoman: मराठमोळ्या मानसी पवार यांची काश्मीरमध्ये रुग्णसेवा, असा घडला पुणे ते काश्मीरपर्यंतचा प्रवास

Source link

Chitra WaghPune newsSupriya Sulesupriya sule punesupriya sule statement on saree
Comments (0)
Add Comment