टेबलावरुन मसाले उद्योगाला सुरुवात
अकोला शहरातील लहान उमरी परिसरात रहिवासी असलेले पुडलिंकराव इंगळे यांचे कुटुंब. त्यांच्याकड़ं सांगळूदला इथे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यात ते पारंपरिक पिके घ्यायचे, मात्र त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढं उत्पन्न मिळत नव्हते. त्यानंतर या कुटुंबाने म्हणजेच पुंडलिंकराव हे २००७ च्या सुमारास छोट्या टेबलावर अर्धा किलो ‘ओला मसाला’ ठेवून विक्री करायचे. यासोबतच त्यांचा चप्पल: विक्रीचा देखील व्यवसाय होता.
नोकरीचा नाद सोडला
पुंडलिकराव यांचा मुलगा अनिलने ‘एमएसडब्ल्यू’ पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करूनही त्याला नोकरी लागत नव्हती, त्यामुळे नोकरीचा नाद सोडत अनिलने बदलती बाजारपेठ, ग्राहकांचा कल या गोष्टींचा अभ्यास करून वडिलांच्या मसाला उद्योगाची जबाबदारी स्वीकारली. सध्या मसाले उत्पादनात अनेक व्यावसायिक आहेत. मात्र आपले वेगळेपण असावे, यातून त्याने ओला मसाला तयार करण्यास सुरुवात केली. यात लसूण, कांदा, खोबर, आले पेस्टसह अन्य घटकांचे मिश्रण असतेय. हा मसाला भाजी तयार करण्यासाठी थेट वापरता येतो. स्वाद व दर्जा टिकवून ठेवल्याने ग्राहकांचा विश्वास अनिलला मिळाला.
असा झाला व्यवसायाचा विस्तार
इंगळे कुटुंबांचा ओला मसाल्याची अर्धा किलो विक्री यापासून सुरू झालेला व्यवसाय दिवसाला सरासरी १३-१५ किलो विक्रीपर्यंत पोहोचला. आठवडयातील रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी ही विक्री २० किलोहून अधिक पर्यंत पोहोचते. या उत्पादनाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विविध प्रकारचे अन्य मसाले तयार करण्यास अनिलने सुरवात केली. अकोला भाग वन्हाड प्रांतात मोडतोय. या भागाची वेगळी चव ठळकपणे पुढे यावी यासाठी लहान भावाच्या नावावरून ‘निखिल वन्हाडी मसाला’ नावाने ब्रॅण्डचे नोंदणीकरणही केले. तर याबरोबर आवश्यक सर्व संमती व प्रमाणपत्रेही घेतली आहेत.
मुंबई पुण्यातही विक्री
आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनिल प्रयत्नशील आहेय. अकोला जिल्ह्यात सर्वत्र त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातही त्याने मसाले पोहोचले आहेत. मुंबई, पुणे आदी शहरांत विदर्भातील अनेक मंडळी राहतात. त्यांच्याकडून या वऱ्हाडी चवीच्या मसाल्यांना मागणी असते. अशा शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना काळात मसाले उद्योगाला खूप चांगली संधी उपलब्ध झाली होती. बाहेरील मसाल्यांची आवक कमी झाल्याने स्थानिक उत्पादनांना मागणी वाढली. त्यावेळी ग्राहकांची संख्या वाढवणे शक्य झाल्याचे अनिल सांगताहेत.
इथे तयार केले जाणारे मसाले
ओला मसाला मटण, चिकन, फिश, गरम मसाला, रोस्टेट, कांदा-लसूण, पनीर, बिर्याणी, अंडाकरी, पावभाजी, चाट, म, दूध मसाला, लसूण चटणी, कसूरी मेथी, मिक्स. त्याचबरोबर जिरा पावडर, हळद, मिरची, धने पावडर यांचेही उत्पादन. सर्व उत्पादनांना अस्सल देण्यात आली आहे.
व्यवसायाला मिळाले शासनाचे पाठबळ
शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचीही मदत या व्यवसायाला झाली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून मसाला किंग यंत्रासाठी साडेतीन लाखांचे अनुदान मिळाले. यापूर्वी ‘आत्मा’अंतर्गत महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम कार्यक्रमातून मसाला यंत्रासाठी ३५ हजार रूपयांचे पाठबळ तर आता जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दिला असून, तो लवकरच मार्गी लागेल, असे अनिलने सांगितले. हा व्यवसाय वाढविण्यापूर्वी त्याने एका प्रशिक्षण संस्थेतून ३० दिवसांचे तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रशिक्षण घेतले. मग या व्यवसायाला योग्य दिशा देता आली.
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
गटाद्वारे संघटित होता आले तर विक्री व्यवस्था अजून बळकट होते. त्यासाठी शेतकरी कंपनी हा चांगला पर्याय आहे. हीच बाब हेरुन अनिलने शेतकरी गटाची स्थापना केली. सोबतच नर्मदा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापन केली असून ही कंपनी चांदुर इथे आहे. त्यात २५० शेतकरी सभासद झाले आहेत. कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
वर्षाला ३५ लाखांहून अधिक उलाढाल
ग्राहकांची गरज ओळखून ओला मसाल्याच्या अर्था किलोपासून विक्री सुरुवात झाली असून आता ४०० रुपये प्रति किलोने आता थेट विक्री होते. उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली. दिवसाला सुमारे दोन ते दिवसाला सुमारे दोन ते अडीच क्विंटल मालनिर्मितीचे उदिष्ट आहे. स्थानिक पातळीवरून कच्चा माल खरेदीला पसंती, आकर्षक दर्जाचे व्यावसायिक मूल्य असलेले पॅकिंग. चव दर्जा यात तडजोड नाही, आता या व्यवसायातून वर्षाला ३५ लाखांहुन अधिक उलाढाल होत आहे.
व्यवसाय प्रगतीसाठी कुटुंबाचे योगदान
या व्यवसायात सुरुवातीपासूनच संपूर्ण कुटुंबाचे योगदान आहे, अनिल याच्यासह वडील पुंडलीकराव, आई नर्मदाबाई, पत्नी रोशनी असे कुटुंबातील सर्व जण व दोन कामगार व्यवसायात आहेत. अनिल यांचा भाऊ निखिल ‘बीएएमएस एमडी’ आहे. कुटुंबाच्या व्यवसायाला त्याचाही हातभार आहे. मसाले विविध भागांत पोहचवण्यासाठी १० पेक्षा अधिक व्यक्तीची नेमणूक कमिशन’ तत्त्वावर केलीय. मामा हरिदास वानेरे यांचेही प्रोत्साहन व सहकार्य अनिलला व्यवसायात उपयोगी ठरले. मात्र छोटेखानी उद्योगातून अनिलला आर्थिक भरभराटीचा प्रगतीचा मार्ग मिळाला. आज राहत असलेल्या घरासमोर मोठी जागा विकत घेऊन बांधकाम केले, इथेच आता मसाला व्यवसाय आता मोठ्या स्वरूपात आकाराण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा
नऊ जणांना रोजगार दिला आहे. दरम्यान, मसाले पॅक करण्यासाठी इथे मशीनचाही उपयोग केला जातोय, ५०० ते १००० ग्रॅम वजनाचे पॅकिंग सुद्धा इतके होतात. म्हणजे पॅकिंग करण्यासाठी मशीनचा वापर होतोय. दरम्यान, अनिलचा वाढता व्यवसाय बघून अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या व्यवसाय स्थळी भेट दिली, तसेच मसाल्याच्या मालाची पाहणी केली. त्याचबरोबर अनिलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.