पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी मला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन माझ्यासोबत अश्लील चाळे केले. मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंधही ठेवले.
या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला आणि संबंधित संशयित आरोपी तरुण यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगच्या क्लिप पीडित महिलेच्या पतीला पाठवण्यात आल्या. त्यातील संभाषण व्हायरल होईल, या कॉलमुळे आपली समाजात बदनामी होईल, या भीतीने पीडित महिलेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर हे करत आहेत.