कोल्हापूर म्हटलं की विषयच हार्ड, लग्नाचं नादखुळा निमंत्रण! ती लग्नाची पत्रिका नेमकी कोणाची?

Kolhapur local news | हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात एखादी नजरेत भरणारी गोष्ट सोशल मीडियावर एका फटक्यात व्हायरल होते. कोल्हापूरातील एका पठ्ठ्यालाही सध्या याचा पूरेपूर अनुभव येताना दिसत आहे. कोल्हापूरचा आर.जे. सुमित सध्या त्याच्या लग्नाच्या पत्रिकेमुळे (Wedding card) सोशल मीडियावर चांगलाच फेमस झाला आहे. त्याची लग्नाची पत्रिका अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

लग्नाची पत्रिका व्हायरल

हायलाइट्स:

  • सुमित आणि श्वेता या जोडप्याची ही लग्नपत्रिका
  • आपण एरवी लग्नाच्या ज्या पत्रिका पाहतो त्यावर अत्यंत साचेबद्ध मजकूर पाहायला मिळतो
कोल्हापूर: हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात नजरेत भरणारी किंवा इतरांपेक्षा उठून किंवा हटके दिसणारी गोष्ट इंटरनेटवर क्षणार्धात व्हायरल होते. याचाच प्रत्यय सध्या कोल्हापूरातील एका पठ्ठ्याला येत आहे. या पठ्ठ्याच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. कारण या लग्नपत्रिकेवरील मजकूर कोल्हापूरच्या खास रांगड्या बोलीभाषेत लिहला आहे. आपण एरवी लग्नाच्या ज्या पत्रिका पाहतो त्यावर अत्यंत साचेबद्ध मजकूर पाहायला मिळतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेतील स्टार्ट टू एंड मजकूर असला काही भन्नाट लिहला आहे की, विचारायची सोय नाही. सुमित आणि श्वेता या जोडप्याची ही लग्नपत्रिका अनेकांना प्रचंड आवडली. त्यामुळे अल्पावधीत ही लग्नपत्रिका व्हायरल झाली. त्यानंतर ही लग्नपत्रिका नेमकी कोणाची असावी, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे उत्तरही आता समोर आले आहे. (Marriage invitation card viral on internet)

ही लग्नपत्रिका कोल्हापूरमधील R J Sumit याची आहे. येत्या २७ नोव्हेंबरला सुमित आणि श्वेता यांचे लग्न आहे. आपल्या हटके आणि रांगड्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या सुमितच्या मनात आपल्या लग्नाची पत्रिकाही हटके असली पाहिजे, असा विचार घोळत होता. त्यावर विचार करताना सुमितला ही सहजसोप्या आणि दैनंदिन वापरातील बोलीभाषेत लग्नाची पत्रिका लिहण्याची कल्पना सुचली. सुमितने त्याच्या लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांसाठी पारंपरिक पद्धतीची वेगळी पत्रिका छापली आहे. मात्र, सोशल मीडियावर आपल्या आयडेंटिटीला साजेशी अशी लग्नपत्रिका असावी, असा विचार सुमितच्या डोक्यात होता. त्यानुसारच मी ही पत्रिका लिहल्याचे सुमितने सांगितले.

सोशल मीडियावर लोक मला कोल्हापूरचा आर.जे. सुमित म्हणून ओळखतात. मग आपण आपल्याच भाषेत लग्नपत्रिका लिहूयात, असा विचार माझ्या मनात आला. मग मी स्वत:च लग्नपत्रिकेचा सर्व मजकूर लिहला. त्यानंतर एका मित्राकडे ही पत्रिका छापायला दिली. त्यांनीही माझा मजकूर पाहून त्याला साजेशी अशी डिजिटल पत्रिका तयार करुन दिल्याचे सुमितने सांगितले.

लग्नाची पत्रिका व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

kolhapur local newsmarriage invitationrj sumit kolhapurrj sumit weds shwetaviral news social mediawedding cardकोल्हापूर मराठी बातम्यालग्नपत्रिका व्हायरल कोल्हापूरलग्नाची पत्रिका कोल्हापूर आर जे सुमित
Comments (0)
Add Comment