पुण्यातील तरुणांनी मृत्यूला कवटाळलं, धागेदोरे राजस्थानपर्यंत, २५०० गावकरी सेक्स्टॉर्शनमध्ये

पुणे: सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील एक गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचं गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.

हेही वाचा -Shraddha Walkar Case Big Update: श्रद्धा वालकर प्रकरणी मोठी अपडेट, आफताबची कोर्टात कबुली, म्हणाला – जे झालं ते रागाच्या भरात

पोलिसांच्या पथकावर गावकऱ्यांचा हल्ला

पुणे पोलिसांच्या एका पथकाने थेट ते गाव गाठलं आणि तेथून अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलं.

चौकशीत धक्कादायक माहिती उघड

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं त्याने सांगितलं. हे अत्यंत धक्कादायक आहे.

हेही वाचा -IND VS NZ: न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत विजय, तरी हार्दिकवर चाहत्यांचा संताप, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

कशी केली जाते फसवणूक?

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असं सांगून तरुणांना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात. त्यानंतर हे फोटोज मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यांची फसवणूक केली जाते. सध्या हे प्रकार फार वाढले आहेत.

पुण्यातील दोन तरुणांची आत्महत्या

अशाच एका प्रकरणात वारंवार पैशांची मागणी करण्यात आल्याने पुण्यातील शंतनु वाडकर आणि अमोल गायकवाड या तरुणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

हेही वाचा -लाल सुटकेसमध्ये फेकलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली, जन्मदात्या बापानेच घेतला जीव, कारण…

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Source link

gurugothadi village sextortion racketpune latest updatepune sextortion case updaterajsthan village in sextortion racketsextortion casesextortion racketपुणे क्राईमपुणे पोलीससेक्स्टॉर्शन रॅकेट
Comments (0)
Add Comment