शेतात रात्रीच्या वेळी रानडुकरे पीक फस्त करत असल्यामुळे गौतम शेतावर लक्ष ठेवण्यासाठी सोमवारी रात्रीच्या वेळी गेला होता. सकाळी तो घरी लवकर परतला नसल्याने त्याच्या वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता गौतमने झाडाला गळफास लावल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. गौतमच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम सुभाष डोंगरे याच्याकडे एक एकर शेत होते. या शेताच्या भरोशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व आर्थिक गणिते अवलंबून होती. कुटुंबाचे पालन पोषण करत असताना त्याला अधिकाधिक मदत व्हावी व शेती या व्यवसायातूनच नफा होऊन आर्थिक परिस्थिती सुधारविण्यासाठी त्याने लागवडीने शेत केले होते. त्यामध्ये त्यांनी हरभरा या पिकाची पेरणी केली होती.
मात्र, रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेलेले गौतम सकाळी उशिरापर्यंत आले नाहीत त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या मनात अनेक शंका कुशंका उपस्थित झाला. त्यानंतर ते शेतावर गेले असता त्यांना एक मोठा धक्का बसला यावेळी गौतमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली.