एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरुचा ॲसिड हल्ला, प्रवासी भेदरले, पोलिसही जखमी!

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Nov 2022, 6:58 pm

Nashik News : मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या वातानुकूलीत डब्यात एका माथेफिरूने प्रवाशांवर ॲसिडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी मनमाड रेल्वे स्थानकावर घडली आहे.

 

एक्सप्रेसच्या एसी डब्यात माथेफिरुचा ॲसिड हल्ला, प्रवासी भेदरले, पोलिसही जखमी!
नाशिक (मनमाड, रईस शेख) : मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या वातानुकूलीत डब्यात एका माथेफिरूने प्रवाशांवर ॲसिडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी मनमाड रेल्वे स्थानकावर घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडून भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ पोलीस निरीक्षक शिरीष ढेंगे यांच्यासह आरपीएफ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माथेफिरुला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं आहे. माथेफिरूने केलेल्या ॲसिड हल्ल्यात २ प्रवासी आणि २ आरपीएफ जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात एक माथेफिरू धुमाकूळ घालून प्रवाशांवर हल्ला करत असल्याचा आरपीएफला समजलं. आरपीएफ जवानांसह पोलिसांनी प्लॅटफार्म क्र.३कडे धाव घेतली. रेल्वे येताच या सर्वांनी एसी डब्याकडे धाव घेतली आरपीएफ आल्याचे पाहून या माथेफिरूने स्वतःला शौचालयात बंद करून घेतले. आरपीएफ अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्याला बाहेर येण्याचे सांगितले. मात्र, त्याने बाहेर येण्यास नकार दिल्यानंतर अखेर शौचालयाच्या दाराची कडी तोडून त्याला बाहेर काढलं.

क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत दिले नाही, बांधकाम व्यावसायिकाचा बेदम मारहाण करून खून
त्यानंतर माथेफिरूने पोलिसांच्या अंगावर देखील ॲसिड फेकले त्यामुळे एकच खळबळ उडाली. अखेर धाडस करून आरपीएफ जवानांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले. या ॲसिड हल्ल्यात धर्मेंद्र यादव, विनायक आठवले हे दोन आरपीएफ जवान आणि २ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पकडण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव धनेशवर यादव असून तो भागलपूरचा असून त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. माथेफिरुने हे कृत्य का केलं? याचा रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड तपास करत आहेत.

राज ठाकरे आणि फडणवीसांच्या एकीला ठाकरेंचं उत्तर, २०१२ चं टायमिंग पुन्हा साधणार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

nashik crime newsnashik local newsnashik pawan express train acid attacknashik train acid attackनाशिक क्राईम न्यूजनाशिक पवन एक्सप्रेस रेल्वे ॲसिड हल्लानाशिक रेल्वे ॲसिड हल्ला
Comments (0)
Add Comment