साईबाबांचं दर्शन घेऊन CM थेट भविष्य बघायला गेले? दौऱ्यात अचानक बदल, पोलिसांची तारांबळ

शिर्डी (अहमदनगर) : मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या आणि ते हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले. तिथे सपत्निक साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणं अपेक्षित असताना त्यांचा ताफा वळाला सिन्नरच्या मिरगावच्या शिवारात…. तिथे त्यांनी एका ज्योतिषी बाबाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावून साईंचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या दिशेने रवाना झाला. अचानक बदललेल्या या दौऱ्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

मिरगावच्या शिवारात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. मात्र माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. तिथे मुख्यमंत्री एका ज्योतिषी बाबाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री ज्या बाबाला भेटले ते भविष्यवाणी करत असल्याची माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्री शिर्डीत आले आणि मिरगावात भविष्य पाहायला पोहोचले अशीच चर्चा परिसरात होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषकडून खरंच भविष्य जाणून घेतलं का? आणि भविष्य जाणून घेतलं असेल तर नेमकी काय माहिती विचारली? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहत आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत शिर्डी दौऱ्यात कोण कोण होतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते

Source link

Eknath Shindeeknath shinde in sinnareknath shinde newsMaharashtra newsMaharashtra politicsshinde shirdi tourएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे ज्योतिश वावीएकनाथ शिंदे मिरगाव ज्योतिष भविष्यएकनाथ शिंदे मिरगाव भविष्य
Comments (0)
Add Comment