खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीवरून अकोला लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली असा आरोप खासदार भावना गवळींनी केला.
दरम्यान, घोषणाबाजी करणाऱ्यांच्या मुलीबद्दल पत्नीबद्दल कोणी अशा घोषणाबाजी दिल्या असत्या, व्यक्तव्य केल असतं, हिन दर्जाची वागणूक दिली असती, घाणेरडे बोलले असते तर चालले असते का? काल अकोला रेल्वे स्थानकावर घडलेला प्रकार म्हणजे त्यांची कृती पाहली असती तर अत्यंत तुच्छ कृती होती. जर अशा प्रकारे कृती त्यांच्या बहिणी आणि पत्नीबद्दल दिली असती, ते सर्व त्या ठिकाणी पहात उभे राहिले असते का? असे सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केले असून या संदर्भात तक्रार लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली त्यानंतर आता हे गुन्हे दाखल झाले आहेत.
उद्या आमदार नितीन देशमुखांची पत्रकार परिषद
दरम्यान गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी या संदर्भात बोलायला नकार दिलाय, उद्या सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये सर्वच बोलू असे देशमुख म्हणाले. देशमुख पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष लागून असणार.
नेमकं काय घडलं होतं अकोला रेल्वे स्थानकावर?
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. विदर्भ एक्सप्रेसने काल रात्री अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली. यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते. यादरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. तसेच रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या होत्या.