काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या दुधलम गावात प्रताप पंडित यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. तर त्यांच्या शेजारीच त्यांचे चुलत भाऊ किशोर पंडित हे राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या किरकोळ वादातून भांडण व्हायचं. आजही त्यांच्यात घरासमोर पाणी सांडल्यामुळे वाद झालाय. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर हत्येपर्यंत पोहचले.
क्लिक करा आणि वाचा- भावना गवळी आक्रमक; खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर अकोल्यात गुन्हे दाखल
दरम्यान, या वादात किशोर पंडित यांनी कुराडीने पिता प्रताप पंडित आणि पुत्र सुरज पंडित यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघे पिता पुत्र गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. आज रात्री साडेनऊच्या सुमारास हे हत्याकांड घडले असल्याचं सांगण्यात येत आहे, या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले. त्यासोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी हजेऱ्या लावल्या.
क्लिक करा आणि वाचा- वारंवार अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले हटके बॅनर, सोशल मीडियावर झाले व्हायरल
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकरी किशोर आणि मृतक प्रताप हे दोघे चुलत भाऊ असून शेजारीच राहत होते. किरकोळ कारणांवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून दोघांची हत्या झाली. याप्रकरणी पिंजर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान मारेकरी किशोर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचे समजते आहे.
क्लिक करा आणि वाचा- प्रकाश आंबेडकर मविआत येणार का?, मुख्यमंत्र्यांसोबत गुंडाचा फोटो…; वाचा, टॉप १० न्यूज बुलेटीन