वाचा: ‘आपापली मुलंबाळं, जनावरं घेऊन वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा’
सततच्या पावसामुळं साताऱ्यातील अनेक डोंगर भाग खचले आहेत. जिल्ह्यातील कोंडावळे गावात गुरुवारी संध्याकाळी माळीण सारखी दुर्घटना घडली. दरड कोसळून गावातील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचाव पथकानं तातडीनं हालचाली करून २७ जणांना बाहेर काढलं. जिल्हा प्रशासन या दुर्घटनेतून सावरत नाही तोच रात्रीच्या सुमारास पाटण तालुक्यातील आंबेघर गावात दरड कोसळली. त्यात सात ते आठ घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर, १५ ते २० घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
वाचा:अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
दुसरीकडं, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. तर, अनेक जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.