म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ॲड. मजीद मेमन यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ‘वैयक्तिक कारणामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मागील १६ वर्षे आपणास राष्ट्रवादीत मानसन्मान मिळाला. यापुढे शरद पवार यांच्यासोबत आपल्या शुभेच्छा राहतील’, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
‘विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा विचार करावा’, असा सल्ला काही दिवसांपूर्वी ॲड. मेमन यांनी दिला होता. ‘निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रात फेरफार करण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. पंतप्रधान मोदी दिवसाचे २० तास काम करतात. हे त्यांचे विलक्षण गुण आहेत. टीका करण्यापेक्षा त्यांचे कौतुक केले पाहिजे’, असेही मेमन यांनी म्हटले होते.
दरम्यान, मेमन यांनी शरद पवारांच्या पुढे पुढे करत राज्यसभा पदरात पाडून घेतली होती. राष्ट्रवादीला वाढविण्याच्या कामात कोण चांगला, कोण कुचकामी याची जाणीव नेतृत्वाला नसल्यानेच हे होत असल्याचा उद्वेग पक्षातील एका मोठ्या नेत्याने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.
आम्ही त्यांना ३० जूनलाच चांगला हात दाखवला आहे, ज्योतिष प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पवार,