मिळालेल्या माहिती नुसार या प्रकरणी तक्रारदार यांना व त्यांच्या मित्राला शिवभोजन थाळीचे कंत्राट मिळाले असून त्यांचे थकबाकीत असलेले शिवभोजन थाळीचे बिल उपविभागीय अधिकारी कार्यालयाला लवकर पाठविण्याकरिता पुरवठा विभाग येथील पुरवठा निरीक्षक निलेश राठोड यांनी तक्रारदाराकडे ८० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या संदर्भातील तक्रार तक्ररदार यांनी २१ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्याकडे दाखल केली.
या तक्रारीवरून २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान निलेश राठोड यांनी तक्रारदार यांना त्यांचे व त्यांच्या मित्रांचे प्रत्येकी ३५,००० रू असे एकूण ७०,००० रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
सोनं समजून कित्येक वर्षे दगड जपून ठेवला; पण तो सोन्याहून भारी निघाला; लॉटरीच लागली ना भाऊ
आज २५ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष रचण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान राठोड यांनी सदर लाचेची रक्कम दुसरा आरोपी अब्दुल अकिब, वय २५ वर्ष, रा. सौदागर पुरा जैन मंदिर जवळ वाशिम ता. जि. वाशिम याच्या मार्फत त्यांच्याच कार्यालयामधे स्वीकारल्याने दोन्ही आरोपींना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध पो.स्टे. वाशिम शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राष्ट्रवादी की आमचा पक्ष एक नंबर लोकांना ठरवू द्या,पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची गर्जना
याच कार्यल्यात मागील वर्षीही कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका व्यक्तीला लाच घेताना अटक करण्यात आली होती, तेव्हा तो इसमही राठोड यांच्यासाठीच वसुली करत होता अशी चर्चा होती. तेव्हा मात्र निलेश राठोड सापळ्यातून सुटला होता. पुरवठा विभागातील या कार्यालयात, रेशनकार्ड संदर्भातील कामासाठी गोर गरिबांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याचे नागरिक आता कारवाई नंतर सांगत आहेत.
अमोल कोल्हेंनी संशयाचं धुकं हटवलं; भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर मोजक्याच शब्दांत राजकीय दिशा स्पष्ट