Beed News : जमिनीच्या तुकड्यासाठी पुतण्याने चुलता- चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चुलत्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे सकाळी घडली आहे.
सकाळी शेतीच्या वादातून रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलता आणि चुलतीवर राहत्या घरी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बळीराम निर्मळ आणि त्यांच्या पत्नी केसरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून केसरबाई निर्मळ यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत बळीराम निर्मळ यांची मुले नोकरी निमित्ताने बाहेर आहेत. पती-पत्नीच घरी होते. हा शेतीचा वाद खूप जुना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ (वय ५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतीच्या वादातून काका पुतण्यामध्ये अनेक वेळा छोटे-मोठे वाद झाले होते. मात्र, शेतीच्या तुकड्यासाठी चक्क पुतण्याने चुलता चुलतीचे चक्क धारदार शस्त्राने तुकडेच पाडले असल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेतीचा वाद हा कुठपर्यंत जाऊ शकतो आणि रक्तरंजित कहानी निर्माण होऊ शकते ते या सकाळी घडलेल्या घटनेने समोर आले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्या दोघांनाही रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र. त्यात चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चुलतीवर अजूनही उपचार चालू आहेत. या सगळ्या गोष्टीचा तपास सध्या पोलीस प्रशासन घेत आहे.
लवकरच ठाकरेंचे बाकीचे आमदारही आमच्यात येऊ शकतात, रावसाहेब दानवेंचा दावा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.