भारतातील बारा शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला आम्ही आलोय. त्या देवीचा नवस फेडायला दर्शन घेयला आम्ही आलोय. मात्र त्या देवीची कोणी विरोधक जर का मस्करी उडवणार असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तो अनुभव घेतलाय. आमची श्रद्धा आहे. आम्ही श्री कामाख्य देवीचे दर्शन घ्यायला अलोय. यामुळे विरोधकांनी देवीची मस्करी उडवणे योग्य नाही, असे मत आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे भाजपचं सरकार खाली खेचण्याचा नवस बोलायला गेले असतील, भास्कर जाधवांचा टोला
देवीला रेड्याच्या बळीवरून विरोधक बोलतायत. पण त्यांच्या मतदारसंघातही या प्रथा आहेत, त्याबद्दल त्यांनी आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरे आता संवाद मिळाला घेत फिरत आहेत. मात्र हा संवाद सर्वात पूर्वी साधला असता तर ही वेळ आली नसती. आता उशिरा का होईना संवाद घेत असतील तर ती गोष्ट चांगली आहे. त्याबद्दल वाईट मत असण्याचे कारण नाही, असे आमदार योगेश कदम म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांजवळ कोणताही संवाद साधला नाही. आणि आता ते संवाद मेळावे घेत फिरत आहेत. हे तुम्ही अडीच वर्षे पूर्वीच केले असते तर बरे झाले असते, असे म्हणाले.
कोकणातला बाण राणेंच्या जिव्हारी, अंधारेवर टीका करताना राणे संतापले तर आदित्य ठाकरेंना धमकी
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक भाजप युवा मोर्चा आणि आम्ही चर्चा करून लढवू. त्यात यशस्वी होऊ. नक्कीच आम्हाला सिनेटच्या निवडणुकीत यश येईल. आम्ही त्यादृष्टीने चर्चा करतोय, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.