अलीकडेच म्हणजे १५ वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी आज सायंकाळी ५च्या सुमारास अचानक या पुलावर लोकांना ये-जा करण्यासाठी ज्या सिमेंटच्या पट्टया टाकल्या आहेत त्या खाली रुळावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ जवळ कोसळल्या. त्यामुळे त्यावेळी पुलावर असलेले प्रवाशीही खाली कोसळले. या घटनेने रेल्वे स्थानकावर प्रचंड खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.
रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पुलाचा काही भाग कोसळला व यात ४ जण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जखमींची संख्या दहाच्या वर आहे.
जखमींची नावे -:
साची निलेश पाटील, प्रेम तितरे (४५ वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय १८), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय ३७), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.