मनसेचा मेंदू भाजपकडे गहाण ठेवलाय की काय अशी शंका येणारं भाषण, काँग्रेसचा पलटवार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी आजच्या सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी राहुल गांधी यांचा मेंदू गुळगुळीत असल्याची टीका केली होती. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या व्यक्तीचा आक्रास्ताळा विलाप याशिवाय दुसरी उपमा राज ठाकरेंच्या भाषणाला देता येणार नाही, असं सचिन सावंत म्हणाले.

भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, या भाषणानं शिक्कामोर्तब झालं आहे, असं सचिन सावंत म्हणाले. १६ वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनतेला त्या तर्कसंगत वाटत नाहीत. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Elon Musk आता स्मार्टफोन लाँच करणार, आयफोन आणि सॅमसंगला थेट टक्कर देणार

मनसेचं कार्य जनतेच्या विस्मृतीत जाण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचं ते म्हणतात. जनतेची स्मृती निर्धारित करता येऊ शकते हा जावई शोध त्यांनी लावला आहे, असा टोला सावंत यांनी राज ठाकरेंना लगावला.

मनसेनं खूप भूमिका बदलल्या

मनसेनं निश्चितपणे एवढ्या वर्षात इतक्या भूमिका बदलल्या की आपली खरी भूमिका कोणती हे पाहताना बुद्धीभ्रम होण्याची शक्यता आहे. मनसेनं आपला मेंदू भाजपकडे गहाण ठेवला की काय अशी शंका यावी असं त्यांचं भाषण होतं, असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला.

मनसेचं भोंग्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरु होणार, राज ठाकरेंनी पुन्हा कार्यक्रम दिला

ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात हे हास्यास्पद

ज्या पक्षाला जनतेला ब्लू प्रिंट देणार असं आश्वासन देऊन ती अजून देता आली नाही. ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात ही विरोधाभासी गोष्ट आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं. ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे, असं देखील ते म्हणाले.

एके ठिकाणी महाराष्ट्रातील प्रवक्ते जी भाषा बोलतात त्यामुळं राजकारणाचा स्तरखाली आला आहे असं ते म्हणतात. ज्या पद्धतीची भाषा राहुल गांधींसाठी त्यांनी वापरली त्यावरुन प्रवक्त्यांचे मेरुमणी राज ठाकरे आहेत हे दिसतं, अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे. आम्ही राज ठाकरेंचा निषेध देखील करतो आणि त्यांच्या बद्दल दयाभाव आणि सहानुभूती ठेवतो, कारण दिशाभ्रम झालेल्या नेत्यांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे, असं सचिन सावंत म्हणाले.

उद्धव ठाकरेंची मिमिक्री, सत्तारांवर टीका, मुंबई महापालिकेवर सत्ता, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Source link

mumbai breaking newsMumbai News Liveraj thackerayraj thackeray full speechraj thackeray liveraj thackeray on bharat jodoraj thackeray on congressSachin Sawant
Comments (0)
Add Comment