शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आढळराव पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शिरूर तालुक्यात संघटना बांधणी अतिशय जोमाने केल्याबद्दल तालुकाप्रमुख पै.रामभाऊ सासवडे व उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे व सर्व शिवसैनिकांचे मुख्यमंत्री असून त्यांच्या कामाचा झपाटा अतिशय वेगवान आहे, असं म्हटलं. शिरूर तालुक्यासह लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले होते. लवकरच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातील ११७ शाखांच्या नामफलकाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आढळराव यांनी दिली.
शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकासात्मक विचारधारा सर्वसामान्यांना आपलीशी वाटत आहे. शिरूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच सर्वसामान्य शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे केले जाईल, अशी ग्वाही शिवाजीराव आढळराव यांनी यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना दिली.
वय काय, बोलतायत काय…! धोतर असा उल्लेख करत राज ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत
शिवाजीराव आढळराव पाटील हे सातत्यानं शिवसेनेच्या तिकिटावर शिरुर लोकसभा मतदारसंघातून विजयी होत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र धक्कादायक निकाल लागला. शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे विजयी झाले. महाराष्ट्रात त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार जून २०२२ मध्ये कोसळलं. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतपर्यंत कायम राहिली तर जागा वाटपात ही जागा कुणाकडे जाणार हा प्रश्न होताच. त्यामुळं उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवा पर्याय स्वीकारला आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
३ भारतीय तरुणांनी मिळून बनवली ५०० किमी रेंजवाली इलेक्ट्रिक SUV, थेट BMW ला टक्कर
शिरुरचा कौल कुणाला मिळणार?
शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपनं देखील ताकद आजमवून पाहायला सुरुवात केली आहे. महेश लांडगे या मतदारसंघातून तयारी करत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि बाळासाहेंबाची शिवसेना आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी देतात आणि मतदार कुणाला कौल देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
मनसेचं इंजिन भाजपच्या ताब्यात यावर शिक्कामोर्तब झालं, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेसचा पलटवार