प्रकाश डबडे (वय वर्ष ४०, राहणार माहतपुरी तालुका गंगाखेड असे अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
गंगाखेड तालुक्यातील माहतपुरी येथील प्रकाश डबडे हे आपल्या दुचाकीवरून परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथे कर्तव्यावर जात होते. त्यांची गाडी परभणी – गंगाखेड रोडवरील ताडपांगरी पाटी जवळ आली असता गाडी ऊसाच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली. त्यामुळे दुचाकी वरील प्रकाश डबडे हे जखमी झाले.
वाहनधारकांनी त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असताना रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
अपघाताची माहिती मिळताच दैठणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी अध्यापर्यंत दैठणा पोलीस ठाण्यामध्ये कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मयत प्रकाश डबडे यांचा मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने डबडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे महातपुरी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान परभणी – गंगाखेड रोडवर उसाचे ट्रॉल्या लावल्या जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रोडवर ट्रॉल्या लावल्यास संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
हेही वाचा : लेकाच्या लग्नात जयंत पाटील भावुक, भर मंडपात डोळ्यात अश्रू, हुंदका देतच पवारांचे आभार
दुसरीकडे, मोडलिंबकडून पंढरपूरकडे जात असताना एक फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्याची घटना काल रात्री घडली आहे. या दुर्घटनेत जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख या जागीच ठार झाल्या असून त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी रात्री तातडीने रुग्णवाहिका बोलावली. सदर कालव्यात उतरायला जागा नसल्याने दोराच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आले. मात्र सदर अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
हेही वाचा : मामे बहिणीला प्रेम प्रकरण समजलं, पळून जाण्याचा प्लॅनही उघड, बॉयफ्रेण्डच्या साथीने ताईकडूनच हत्या