नांदेडमध्ये ACBच्या जाळ्यात आडकल्या त्यांच्याच खात्याच्या PI!, पतीसह कोठडीत रवानगी

नांदेड : भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातच कसा भ्रष्टाचार चालतो, याचे ताजे उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थामार्फत लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाला एसीबीनेच पकडले आहे. मीना बकाल, असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांच्या पतीलाही अटक केली आहे. आता या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली.

अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांच्या भाऊ शेख मेहराज यांचा कंधार येथील तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. तुमच्या विरोधात तक्रार आली असून त्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या भावाला एसीबी कार्यालयातून बोलाविण्यात आले होते. ही बाब त्यांनी खाजा मगदूम शेख यांना सांगितली. त्यानंतर शेख यांना सय्यद शकील सय्यद अजीमसाब आणि सय्यद इस्माइल सय्यद अजीम या दोघांनी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली.

खाजा मगदूम शेख यांनी मुंबई आणि नंतर औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली होती. २१ नोव्हेंबर रोजी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीबीने पोलिस निरीक्षक मीरा बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर या दोघांना अटक केली. बकाल यांनी मध्यस्थाकडून या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारदार खाजा मगदूम शेख यांच्या भावाला वेगवेगळ्या क्रमांकावरून आलेल्या कॉलची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस निरिक्षक मीरा बकाल, कुलभूषण बावसकर आणि इतर दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेतकऱ्यांना महावितरणाचा ‘शॉक’; कृषिपंपाचा पुरवठा खंडित

बकाल वर्षभरापासून नांदेडात

पोलिस निरीक्षक मीरा बकाल या २०१२ मध्ये पोलिस खात्यात रुजू झाल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या नांदेडच्या एसीबी युनिट येथे कार्यरत होत्या. त्यांच्यावर भ्रष्टाचाराला आळा घालण्याची जबाबदारी असताना त्यांनीच तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

डीजे लाव! बंद का केला? रिसेप्शनमध्ये सात-आठ तरुणांनी वाद घातला अन् पुढे अनर्थ घडला

Source link

Anti Corruption Bureauanti corruption raidbribe casenanded news todaypolice inspector
Comments (0)
Add Comment