कल्याणमध्ये गॅस गळतीने स्फोट, सासू-सून गंभीर जखमी, दीड महिन्यांचं बाळ थोडक्यात वाचलं

कल्याण : गॅस लिकेजमुळे स्फोट झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात घडली आहे. या स्फोटात किचनमध्ये काम करणाऱ्या सासू सुना गंभीर जखमी झाल्या आहेत, मात्र बेडरुममध्ये असलेलं दीड महिन्यांचं बाळ सुदैवाने या घटनेतून बचावलं आहे. बाळाला कुठलीही दुखापत झालेली नाही.

कल्याण पश्चिम येथील आरटीओ सर्वोदय हाईट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅस लिकेज झाल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात दोन महिला जखमी झाल्या. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण आणले. मात्र मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज होत असल्याने इमारतीत पाणी मारून अग्निशामक दलाने लीकेजवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलून सिलेंडर लीकेज थांबवत नियंत्रण मिळवण्यात आले. सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नावं असून दोघी सासू सूना आहेत.

हेही वाचा : ‘टोयोटा’ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

याच दरम्यान घरात बेडरूममध्ये महिला व तिचे दीड महिन्याचा बाळ होते, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तर स्फोटात किचनचे नुकसान झाले आहे. गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. घरी स्वयंपाक करताना गॅस गळती झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : मावशीला म्हणाली बापू पुलाजवळ जाऊन येते, रात्रभर मुलगी घरी नाही, तीन दिवसांनी अनर्थ समोर

Source link

daughter in lawkalyan cylinder blastkalyan gas leak blastMaharashtra news todaymother in lawकल्याण गॅस लिकेज स्फोटकल्याण वायूगळतीकल्याण सिलेंडर ब्लास्टसासू सून जखमी
Comments (0)
Add Comment