सीमेवर नजर ठेवण्याचे काम
अर्जुन भारतीय हद्दीत आलेल्या शत्रुचे ड्रोनतर पाडतोच त्याचबरोबर सर्विलान्स म्हणजेच सीमेवर नजर ठेवण्याचे काम देखील करु शकतो. गरुडाच्या डोक्यावर एक छोटासा कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसंत, शत्रुच्या हद्दीत जाऊन तिथले लाइव्ह चित्रणही करु शकतात.
भारतीय लष्कराचा युद्धाभ्यास
भारतीय सेनेचं मेरठ येथील रीमाउंट वेटरिनरी कोरमध्ये अनेक गरुडांना ट्रेन करण्यात आलं आहे. हे गरुड भारतीय लष्कराच्या कॅनाईन सोल्जर म्हणजेच ट्रेंड डॉग्ससोबत ड्रोनविरोधी यंत्रणा म्हणून काम करतील आणि शत्रूचे ड्रोन पाडतील. सध्या हे गरुड कुठेही तैनात करण्यात आलेले नसून फक्त प्रयोगाच्या टप्प्यात आहे.
गरुडांना दिले प्रशिक्षण
भारतीय हद्दीत शत्रूचा ड्रोन दिसताच गरुड आणि डॉग मिळून खाली पाडतील. जवळपास दोन वर्षांपासून, गरुडांना मेरठमधील रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्स्पमध्ये प्रशिक्षण दिले जातात. गरुडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या मजबूत पखांनी आणि पंजांनी शत्रूवर वार करतात. ड्रोन हा हवेत उडणारी वस्तू आहे. त्यामुळं गरुडांच्या नजरेच्या टप्प्यात येताच ते ड्रोन एका झटक्यात हिसकावून घेतात. लष्कराचे श्वान आणि गरुड दोघं मिळून ते नष्ट करतील, असं प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गरुडांची तीक्ष्ण नजर
लष्कराचे श्वानांचे सजग कान आणि गरुडांची तीक्ष्ण नजर यामुळं हे ड्रोन नष्ट करता येणार आहेत. श्वानांना ध्वनीच्या अशा लहरी देखील ऐकू येतात त्या मानवांनादेखील ऐकणे कठिण आहे. त्यामुळं शत्रूचे ड्रोन भारतीय हद्दीत येताच श्वास मोठ-मोठ्यांनी भुंकून अधिकाऱ्यांना अलर्ट करेल. तर, ड्रोन गरुडांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकणार नाही. गरुड त्याच्या मजबूत पखांनी ड्रोन खाली पडेल, अशी योजना लष्कराने आखली आहे.
ड्रोनचा वाढता वापर
ड्रोनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व देश ड्रोनविरोधी प्रणालीवर काम करत आहेत. गेल्या वर्षी जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. हा पहिला ड्रोन हल्ला होता. यासोबतच पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनीही गेल्या काही काळात ड्रोनचा वापर वाढवला आहे. ड्रोनचा वापर दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी भारतात अंमली पदार्थ पाठवताना दिसून आला आहे. ड्रोनची सहज उपलब्धता सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हाने वाढवत आहे.