शिवाजी महाराजांचा विचार सर्वधर्मसमभावाचा, पण देशात ध्रुवीकरणाचं राजकारण: उदयनराजे

Maharashtra Politics | मला या सगळ्यात राजकारण आणायचे नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशाचप्रकारे अपमान सुरु राहिले तर भविष्यात काय होईल, ते मला माहिती नाही. आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत. असे अपमान सुरु राहिले तर हे प्रकार पुढे अंगवळणी पडतील, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

 

खासदार उदयनराजे भोसले

हायलाइट्स:

  • तुमच्या पक्षात सर्व जातीधर्मांचे लोक असले पाहिजेत
  • जर तुम्ही शिवाजी महाराजांचे हे विचार आचरणात आणणार नसाल तर त्यांचं नाव तरी का घ्यायचं?
सातारा: आज राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. उद्या आणखी दुसऱ्या मोठ्या पदावरील व्यक्ती उठून शिवाजी महाराजांविषयी बोलेल. हे प्रकार खपवून घेतले तर उद्या अशा लोकांचे धाडस वाढेल. त्यामुळे माझा राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सवाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही तुम्हाला काहीच वाटत नाही का? याबाबत राजकीय पक्षांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करायचे नसेल तर राजकीय पक्षांनी त्यांचे नावही घेऊ नये, असा कठोर शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राजकारण्यांना फटकारले. ते बुधवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मला या सगळ्यात राजकारण आणायचे नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशाचप्रकारे अपमान सुरु राहिले तर भविष्यात काय होईल, ते मला माहिती नाही. आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत. असे अपमान सुरु राहिले तर हे प्रकार पुढे अंगवळणी पडतील, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
राज्यव्यापी आंदोलन, महाराष्ट्र बंद की भाजपला सुनावणार? उदयनराजेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष
आजच्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सर्वधर्मसमभाव आणि लोकशाहीच्या मुद्द्यावर भर दिला. तुम्ही शिवाजी महाराजांचा विचार सांगता तेव्हा तुमच्या पक्षात सर्व जातीधर्मांचे लोक असले पाहिजेत. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे हे विचार आचरणात आणणार नसाल तर त्यांचं नाव तरी का घ्यायचं? आपण थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की, पूर्वीच्या काळी हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेश असा अखंड भारत होता. त्या काळात शिवाजी महाराज जन्माला आले होते. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाचा विसर पडल्यामुळे या देशाचे तीन तुकडे झाले. हे असंच सुरु राहिलं, समाज व्यक्तीकेंद्रित होत राहिला तर समाजात तेढ निर्माण होईल. या देशाचे आणखी किती तुकडे होतील, माहिती नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
भगतसिंह कोश्यारींची पदमुक्त होण्याची इच्छा, संजय राऊतांचं ट्विट; राजभवनाकडून तात्काळ उत्तर
या देशाला आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनीच एकत्र बांधून ठेवले आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर देशाचं काय होणार? त्यांनी प्रत्येक धर्माचा, स्त्रियांचा आणि धर्मस्थळांचा अपमान केला. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा लेखणी आणि चित्रपटांच्या माध्यमातून अपमान होत आहे. हे बराच काळ सुरु आहे. आपण इतके कोडगे झाले आहोत का, आपण ज्यांचं नाव सांगतो, त्यांचा अपमान होत असताना शांत बसायचे का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Bhagat Singh KoshyariChhatrapati Shivaji MaharajMaharashtra politicspune local newsshivaji maharaj controversyUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराज
Comments (0)
Add Comment