जेजे, जीटी रुग्णालयांसाठी १९ कोटींचा निधी; आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी मंजुरी

जेजे रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशिन व एमआरआय मशिन जुने झाल्याने तातडीने नवीन मशीनखरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते.

 

जेजे, जीटी रुग्णालयांसाठी १९ कोटींचा निधी; आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी मंजुरी
मुंबई : आधुनिक वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी जेजे आणि जीटी रुग्णालयांना १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या निधीस मंजुरी दिली आहे. १९ कोटींच्या निधीपैकी जेजे रूग्णालयातील ॲन्जिओग्राफी उपकरणासाठी पाच कोटी ७० लाख रुपये तर जीटी रुग्णालयातील स्कॅनर व एमआरआय उपकरणासाठी १३ कोटी ५६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

केसरकर यांनी १९ ऑक्टोबर रोजी जेजे, कामा तसेच जीटी रुग्णालय येथे भेट देऊन वैद्यकीय यंत्रसामग्रीची पाहणी केली होती. जेजे रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया विभागातील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी करणारी यंत्रे तसेच जीटी रूग्णालयात स्कॅनर मशिन व एमआरआय मशिन जुने झाल्याने तातडीने नवीन मशीनखरेदीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते. याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन यंत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केसरकर यांनी केल्या होत्या. ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता देऊन एकूण १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

19 crore fund for jj and gt hospitals mumbaiDeepak KesarkarDistrict Planning Committeefund for gt hospitalfund for jj hospital
Comments (0)
Add Comment