नाशिक : संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन मतभेद दिसले. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. टीका करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा त्यांनी संदर्भ दिला. त्यांच्या याच विधानावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत तुमची आमची युती असली तरी बोलताना भान ठेवा, अशा शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना जाधवांनी भर मंचावरुनच सुनावलं.
नाशिकमधल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रा. गंगाधर बनबरे उपस्थित होते. तर शिवसेनेकडून प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर जाधव यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पक्षाची, संघटनेची ध्येय धोरणे, महापुरुषांचे विचार, आजच्या काळात त्यांच्या कार्याचं महत्त्व यावर विविध नेते मंडळी बोलत असताना प्रा. गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. यावरुनच भास्कर जाधव यांनी बनबरे यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

गंगाधर बनबरे काय म्हणाले?
सावरकरांवर टीका करताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, सावरकरांनी नरक ओकले आणि नरक दुसरी-तिसरीकडे कुठे नसतो तर ब्राह्मणांच्या पोटात असतो, अशा शब्दात कठोर त्यांनी सावकरांवर टीका केली केल्याचं सांगत गंगाधर बनबरे यांनी सावरकरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
भास्कर जाधवांची नाराजी
आपण काय बोलतो? कुणाविषयी बोलतो? याचं भान ठेवायला हवं. मोठी माणसं ही मोठी माणसं होती. ज्या सावरकरांवर तुम्ही उद्गार काढले, ते तुमच्या-माझ्या सारख्यांना शोभत नाही. ती माणसं त्या त्या ठिकाणी मोठी होती. डॉ. आंबेडकर सावरकरांना काय बोलले, तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार तुमचा किंवा माझा असू शकत नाही. त्यामुळे तुमची आमची युती असेल पण बोलताना जरा भान ठेवलं पाहिजे शा शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना भास्कर जाधवांनी भर मंचावरुनच सुनावलं.