दिल्लीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात गुरूवारी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यांची नार्को चाचणी करण्यात आली. यावेळी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकारी, विशेषतज्ज्ञांचे पथकही उपस्थित होते. आफताबची नार्को चाचणी जवळपास दोन तास केली. चाचणीदरम्यान त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देण्यास आफताला थोडा वेळ लागला. चाचणीवेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी आफताब काही वेळ शांत राहिला. ज्यावेळी हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात आले त्यावेळी आफताबनं त्या प्रश्नांची उत्तरे दिली, असं सांगण्यात येत आहे.
नार्को चाचणीदरम्यान, आफताबला अनेक प्रश्व विचारण्यात आले. त्यात श्रद्धा वालकरची हत्या कोणत्या तारखेला करण्यात आली? श्रद्धाला का मारलं? तिची हत्या कशी करण्यात आली? तसेच श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरीरराचे तुकडे कसे आणि कोणत्या शस्त्राने करण्यात आले? ते कुठे-कुठे फेकले? आदी प्रश्न त्याला विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय आफताबला आणखी काही प्रश्न विचारण्यात आले. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत.
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारांची घोषणा, म.टा. ऑनलाइनचे संपादक अभिजीत कांबळे यांना पत्रकारिता पुरस्कार