बुद्धी भ्रष्ठ, चिटुरक्या, नरेंद्र पाटलांसह शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं सडेतोड प्रत्युत्तर

सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उदयनराजे भोसले यांनी निर्धार शिवसन्मानाचा अभियान जाहीर करत यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. भाजप नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यांवर देखील त्यांनी भाष्य केलं. दोन्ही नेत्यांना उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सध्याच्या राजकारण्यासोबत केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झालेले आहेत. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल कोश्यारींवर ताशेरे ओढत त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा ते रायगड अशी निर्धार शिवसन्मानाचा ही यात्रा सुरु केली आहे. उदयनराजेंनी साता-यातुन शिवसन्मान यात्रेला सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांचा केलेला अपमान‌ सहन करणार नाही. आज एक जण वक्तव्य करतोय उद्या उठून सगळेच टीका करायला लागतील, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात, हा कुठला न्याय? संभाजीराजे भडकले

नरेंद्र ,शिवेंद्र, उदयनराजे ही नावं गौण असून छत्रपती शिवाजी ‌महाराजांवर अशा पद्धतीनं बोलणं टाळलं गेलं पाहिजे. नरेंद्र पाटील छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत ही केली तर त्यात गैर नाही, असं म्हणत असतील तर त्यांची बुद्धी भ्रष्ठ झाली आहे असेल, असा टोला नरेंद्र पाटील यांना लगावला आहे. कोणी चिटुरक्यानं मला शिकवू नये मी लढणारा आहे. लढणारा नाही अशी टीका सुद्धा शिवेंद्रराजे यांच्यावर उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

भारती पवार संतापल्या, प्रत्येकाला शहरातच काम करायचंय, मग ग्रामीण भागातले काम कोण करणार?

कुणीही संपर्क केला नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या उदयनराजे भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कुणाचा फोन आलेला विचारण्यात आलं असता त्यांनी कुणाचाही फोन आला नसल्याचं म्हटलं. उदयनराजे भोसले उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करुन पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ते कार्यकर्त्यांसह रायगडला रवाना झाले आहेत. तर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचा विषय उदयनराजे भोसले यांनी सोडून द्यावा, असं म्हटलं आहे. तर, राज्यपालांच्यासंदर्भात जिथं दखल घेणं आवश्यक आहे तिथं देखील घेतली गेली असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रला विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद

Source link

Bhagat Singh KoshyariDevendra FadnavisMaharashtra politicsNarendra Patilshivaji maharaj controversyShivendraraje Bhonsleudayanraje bhonsleudayanraje bhosale bjpउदयनराजे भोसलेनरेंद्र पाटील
Comments (0)
Add Comment