पंढरपूर कॉरिडॉर बाबत चर्चा
पंढरपूर कॉरिडॉर बाबत चर्चा केली आहे. दुकान दूर करायची आणि रस्ता मोठा करायचं याला अर्थ नाही. अशा नोटीस देत असताना परिचारक आणि अवताडे यांनी काय भूमिका घेतली माहित नाही. पण आधी पुर्नवसन मग विकास ही मागणी आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
तिला या गोष्टीचं इतकं व्यसन लागलंय की, जिथं जाईल तिथं…राजीवचा चारू असोपाबद्दल मोठा खुलासा
सुषमा अंधारेंच काम सातत्याने सुरु असल्याने ‘त्यांना’ भीती वाटत असावी
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या डोक्याला नारू झाला आहे, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. यावर देखील नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे यांचं काम सातत्याने सुरु आहे. त्यामुळे त्याची भीती त्यांना वाटत असावी. पण त्यांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींची विधेयकाला मंजुरी
शिवसेना ठाकरे गट राज्यपालांविरोधात आक्रमक
शिवसेना ठाकरे गटानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत यांच्यासह विविध नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर देखील ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना’; राज्यपालांवर कारवाई केव्हा?, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज