Kolhapur : भारती पवार अधिकाऱ्यांवर संतापल्या, प्रत्येकाला शहरातच काम करायचंय, मग ग्रामीण भागातले काम कोण करणार?

कोल्हापूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईचे त्यांनी आज सकाळी दर्शन घेतले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. सीपीआर रुग्णालयात जाऊन त्यांनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. रुग्णालयात सुरू असलेल्या कामावर त्यांनी नाराजी दर्शवत डॉक्टरांना फैलावर घेतले. प्रत्येकाला शहरातच काम करायचे आहे. मग ग्रामीण भागातले काम कोण करणार? सीपीआर रुग्णालयामध्ये मशीन आहेत. मात्र डॉक्टर नाही, अशी परिस्थिती आहे. जर डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

‘७० साल पुराना जमाना अभी नही रहा’

भारती पवार यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला राज्यसभा खासदार धनंजय महाडिकही उपस्थित होते. गरिबांची सेवा करायला डॉक्टर होतो. पण डॉक्टर झालो की हे विसरून जातो. जर डॉक्टर नसतील, तर त्याचे रोटेशन लावा. प्रत्येकाने शहरात थांबायचे. मग ग्रामीण भागात काम कोण करणार? असा स्पष्ट सवाल भारती पवार यांनी केला आहे.

माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असेल तर तुमचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. मी इथून जायच्या आधी मला डॉक्टरांचे रोटेशन लावून दाखवा. ७० साल पुराना जमाना अभी नही रहा, जिथे ग्रामीण भागात साध्या मूलभूत आरोग्य सुविधाही मिळत नाहीत. आता भारतात आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे आणि राज्यात आणि केंद्रात डबल इंजिनचं सरकार आहे. आता तत्काळ सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे खडे बोल सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर भडकल्या.

राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्याला मागील वर्षी ८५ कोटीचा निधी देण्यात आला होता. तर यावर्षी ९० कोटीचा निधी मंजूर आहे. राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्र शासन जिल्ह्यात आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदरचा निधी मंजूर करत असते, तरी या अंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णापर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यात सध्या दोन डायलिसिस सेंटर कार्यरत असून पुढील काळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सुविधा उभारण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना अद्यावत सोयी सुविधा मिळण्यासाठी ज्या रुग्णालयात सोनोग्राफी मशिनरीची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आठवड्यातून किमान एक वेळ तरी डॉक्टरची सेवा तिथे उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉक्टर पवार यांनी दिल्या.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली; डॉ. जयसिंगराव पवार यांचा खुलासा

केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याच्या विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व योजनांची जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. त्याप्रमाणेच देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी व अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी निक्षय मित्र योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

कोल्हापूर लोकसभेची चुरस वाढणार; महाडिक-मंडलिकांना आव्हान देण्यासाठी नवा उमेदवार

Source link

Bharti Pawarbharti pawar lashes out on doctorsbharti pawar meeting in cpr kolhapurcpr kolhapurKolhapur news
Comments (0)
Add Comment