‘ईडी’ च्या दोन मोठ्या कारवाया; मुंबईसह ३ शहरांमध्ये या दलालांवर टाकले छापे

मुंबई :सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दोन मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये नालासोपाऱ्यातील पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे. तर मुंबईसह तीन शहरांत शेअर दलालांवर छापे टाकण्यात आले आहेत.

पहिली कारवाई नालासोपारा येथे मुख्यालय असलेल्या श्री खेतेश्वर अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटीच्या ३ कोटी ५१लाख ०९ हजार ५२४ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली. या पतसंस्थेने नियमबाह्य पद्धतीने ठेवी स्वीकारुन नियमबाह्य कर्ज वाटप केले. त्यात रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- ठाण्यात गोवरचा प्रकोप, मुंबई हादरली… आगरकर-कांबळीचा पत्ता कट; वाचा मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

दुसरी कारवाई ‘ईडी’ ने मुंबई, दिल्ली व चेन्नईत एकाचवेळी केली. शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या सेक्युरेक्लाऊड टेक्नॉलॉजिस लि., क्वांटम ग्लोबल सेक्युरिटीज लि. व प्रो फिन कॅपिटल लि., या कंपन्यांसह युनिटी ग्लोबल फायनान्शियल प्रा.लि. व डेझर्ट रिव्हर कॅपिटल प्रा.लि., या शेअर दलाल व वित्त सेवा कंपन्यांशी संबंधी १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे काही रोखीने व्यवहार केल्याचा संशय ‘ईडी’ ला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- ‘हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना’; राज्यपालांवर कारवाई केव्हा?, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज

याद्वारे १.०४ कोटी रुपयांची रोख, सोने व हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता टाच आणण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. काही दस्तावेज व इलेक्ट्रिकल गॅझेटदेखील जप्त करण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘पिंजरे में पोपट बोले’; खासदार संजय राऊत यांच्यावर नरेश म्हस्के यांची जहरी टीका

Source link

Edenforcement directoratemumbaiStock Brokersईडीसक्तवसुली संचालनालयाने
Comments (0)
Add Comment