संजय राऊत काय म्हणाले?
हा देश फेडरल स्टेट आहे. अनेक राज्यांचा मिळून हा देश बनलेला आहे. ही संस्थानं नाहीत, राज्यं आहेत. सर्व राज्यांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत, अगदी कर्नाटकशी सुद्धा. मुंबई-दिल्लीत अनेक राज्यांची भवनं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नवस फेडायला गुवाहाटीला गेले होते. तिथून आल्यावर त्यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन बांधणार असल्याचं सांगितलं. आनंद आहे, एकमेकांच्या राज्यात गेलं तर एकात्मता वाढेल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर-सोलापुरात कर्नाटकच्या संस्था उभ्या करण्याची घोषणा केली. मुंबईत कानडी बंधूंची भवनं, हॉल आहेत, आमचा कानडी भावांशी काही वाद नाही, तो वाद तुम्हीच निर्माण करताय. जर तुम्ही एका इर्षेने सीमा भागाचा लढा लढून काही गावांवर हक्क सांगत असाल, आणि त्यासाठी जर का कोल्हापूर-सोलापूरमध्ये संस्था उभारत असाल. तर आम्हालाही बंगळुरु आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याची जागा द्या, कारण ती आमची खूप जुनी इच्छा आहे. मग आम्हीही विचार करु, आमचा विरोध नाही, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : १९९५ साली कोणाचा फोटो लावून जिंकून आलात?, अरविंद सावंतांनी भाजपला खडे बोल सुनावले
मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. तुम्हाला उत्तम शिव्या देता येत असतील, आई-बहिणीवरुन उत्तम शिव्या येतात ना, तर त्यांनी त्या महाराष्ट्राचे राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात, आम्ही शिव्या देणाऱ्यावर फुलं उधळू, महाराष्ट्र कौतुक करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय, सावित्रीबाई फुलेंचा अपमान सहन करताय, शिवप्रेमाचं ढोंगच आहे, त्याची लाट आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते, महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्याबद्दल अस्मिता थंड पडते, एवढंच म्हणालो मी. खासदार छत्रपती उदयनराजेंच्या प्रत्येक भावनेबद्दल सहमत आहोत, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या अपमानावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : शीतल म्हात्रेंच्या भावाचा बर्थडे; कायंदे, साळवी आणि प्रभूंची हजेरी, शिंदे गटाशी जवळीक?