मोदी सरकार तरुणांच्या खात्यात दर महिन्याला जमा करणार ३,४०० रुपये, व्हायरल मेसेजमागचे सत्य काय?

नवी दिल्लीः मोदी सरकार देशातील तरुणांच्या खात्यात महिन्याला ३,४०० रुपये जमा करणार असून एका लिंकवर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करा, असा मेसेज तुम्हालाही आला आहे का? या मेसेजवर क्लिक करुन तुम्हीदेखील रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. या व्हायरल मेसेज मागचं सत्य समजताच तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. याउलट तुमच्या खात्यातूनच पैसे वजा होतील. व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रकारचे पैसे खात्यात जमा करत नाही. सरकारनेच हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच, त्यावर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन केलं आहे.

पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने हा दावा खोडून काढला आहे. पंतप्रधान ज्ञानवीर योजनेच्याअंतर्गंत नोंदणी करणाऱ्या सर्व तरुणांच्या खात्यात दर महिना ३, ४०० रुपये जमा करण्यात येतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, पीआयबीने केलेल्या ट्वीटमध्ये या मेसेजवर कोणीही रिप्लाय करु नका. तसंच, असे मेसेज इतर कोणाला फॉरवर्ड करु नका, असं आवाहन केलं आहे.

वाचाः कोरियन तरुणीच्या मदतीसाठी धावले मुंबईतील दोन तरुण, काय घडलं होतं त्या रात्री; वाचा INSIDE STORY

मेसेजमध्ये काय लिहलंय?

सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व तरुणांच्या खात्यात पंतप्रधान ज्ञानवीर योजनेच्या अंतर्गंत ३,४०० रुपये जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आत्ताच नोंदणी करा. खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा, असं या मेसेजमध्ये लिहलं आहे. तसंच, एक लिंकही देण्यात आली आहे.

सरकारने काय अवाहन केलंय?

सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाहीये. कृपया असे मेसेज किंवा लिंक फॉरवर्ड करताना एकदा पडताळणी करा मगच इतर लोकांना पाठवा. तसंच, अशा लिंकवर क्लिक करुन आपली खासगी माहिती देऊ नका, असं अवाहन सरकारने केले आहे.

वाचाः आधी गोळीबार, नंतर सपासप वार; सराईत गुन्हेगाराला संपवलं, पिंपरी- चिंचवडमध्ये सिनेस्टाइल थरार

या गोष्टी लक्षात ठेवा

सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवते. तसंच, या योजनांचा प्रचार हा संबंधित मंत्रालयाकडून किंवा सरकारच्या वेबसाइटवरुन होत असतो. सरकारच्या एखाद्या योजनेविषयी माहिती हवी असल्यास त्या संबंधित विभागाला भेट देऊन तपशील घ्यावा, असं या सरकार वेळोवेळी सांगते. कोणत्याही अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर लगेचच विश्वास ठेवू नका. याआधी ती माहिती पडताळून पाहा. अन्यथा तुम्ही सायबर क्राइमचे शिकार होऊ शकता. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी दहादा विचार करा. अनेकदा फक्त लिंकवर क्लिक केल्यामुळं तुमच्या फोननधील डेटा सायबर चोरांच्या हाती लागतोय.

वाचाः नववर्षाचं मुंबईकरांना मिळणार ‘बेस्ट’ गिफ्ट; बस प्रवास होणार अधिक सुकर

Source link

government schemegovernment scheme fact checkgyanveer yojanapib fact checkviral message checkviral message government scheme check
Comments (0)
Add Comment