गेल्या दोन दिवसांपासून अश्विनी घरातून बेपत्ता झाली होती. २८ नोव्हेंबर रोजी अश्निनी घरात नसल्याचे आढळले. त्यानंतर नातेवाईंकानी ३० नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार गाडगे नगर पोलिस स्थानकात दाखल केली होती. अश्विनीही रत्नदीप कॉलनी अर्जून नगर परिसरात आई व भावासोबत राहत होती. तिचा भाऊ डान्स क्लास चालवत आहे. कुटुंबीयांनी शोध घेऊनही सापडत नाही म्हटल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी सकाळी तोंड धुवत असताना घरच्यांना पाण्यातून दुर्गंधीयुक्त वास आल्याने त्यांनी टाकीत जाऊन बघितले. टाकीत बघितल्यानंतर त्यांना अश्विनीचा मृतदेह आढळून आला. टाकीत अश्विनीचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अश्विनीही उच्च शिक्षित होती. तिने इंजिनीअरिंग केले होते. त्याशिवाय मुंबई, दिल्लीत जाऊन आर्किटेक्टसुद्धा केले होते. तिचे वडिल सेवानिवृत्त शिक्षक होते. अश्विनीच्या असा अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
वाचाः आधी गोळीबार, नंतर सपासप वार; सराईत गुन्हेगाराला संपवलं, पिंपरी- चिंचवडमध्ये सिनेस्टाइल थरार
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, डि सी पी पाटिल, ए सी पी पूनम पाटील गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अर्जून ठोसरे, गाडगे नगर पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले दाखल झाले. घटनास्थळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ ची पाहणी करुन नातेवाईकांकडे चौकशी केली. घटनास्थळी डॉग स्कॉडसह फिंगर प्रिंट पथक दाखल झाले होते. पोलीसांनी दोन तासानंतर मृतदेह युवतीचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढून शवविच्छेदनास जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. उच्चशिक्षित अश्विनीने आत्महत्या केली की हा अपघाती मृत्यू आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
वाचाः जगातील सर्वात महागडा बटाटा, एका किलोसाठी मोजावे लागतात तब्बल ५०,०००; कारण ऐकून हैराण व्हाल