महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा चिघळत चालला असून याकरिता महाराष्ट्रचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई हे कर्नाटकला जाणार आहेत मात्र कोणत्याही महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी इशारा दिला आहे. यावर शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
वाचा- Ind vs Ban Odi: आता बॅटिंग कशी करायची? बांगलादेशला पडला प्रश्न, शमीच्या जागी संघात आला धोकादायक…
संजय राऊत तुम्हीच शिवसेना संपवली
कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तसेच अक्कलकोट वर आपला दावा सांगत येथील गावांसाठी पाणी देखील सोडले यामुळे संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका करत कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात आपला जीव द्यावा, असा टोला लगावला याबाबत बोलताना राजे क्षीरसागर म्हणाले आमच्या अगोदर अडीच वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही सीमा प्रश्नी काय केल? आमचं सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली, मात्र तुम्ही तर वकिलांचे पगार देखील दिले नव्हते. तेही आम्हीच दिले उगाच काहीही विधान करून नागरिकांमध्ये वेगळा वातावरण निर्माण करण्याची भूमिका संजय राऊत यांनी थांबवावी असे क्षीरसागर म्हणाले.
वाचा- IPL 2023: आयपीएलच्या नियमात मोठा बदल; आता प्रत्येक संघात ११ खेळाडू नसणार
तसेच संजय राऊत कोणाच्या जीवावर निवडून आला याचे उत्तर त्यांनी द्यावे. ज्यांच्यावर सध्या तुम्ही टीका करत आहात त्यांच्या जीवावरच तुम्ही निवडून आलेला आहात. आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करत वेगळा गट निर्माण केला आहे. आमदार खासदारांविरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणत क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही राज्यसभेची राजीनामा द्या आणि जनतेमधून निवडणूक लढवून दाखवावी तुम्ही नेहमीच मागच्या दाराने राज्यसभेवर जाता व शिवसेना संजय राऊत तुम्हीच संपवली अशी घणाघाती टीका राजेश क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.