ठाकरे की शिंदे, मनोहर जोशींनी काल कौल दिला अन् आज उद्धव ठाकरे सरांच्या भेटीला

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. मनोहर जोशी यांनी काल वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं म्हटलं होतं. सेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झाल्यानंतर मनोहर जोशींची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल वाढदिवसादिवशी जोशी यांनी भूमिका स्पष्ट करताच उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेत जून महिन्यात पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केलं. तर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. नोव्हेंबर महिन्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर जोशी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळं सस्पेन्स?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर सेनेच्या बड्या नेत्यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या भेटींमुळं मनोहर जोशी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोहर जोशी यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मनोहर जोशी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानं उद्धव ठाकरेंना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

मनोहर जोशी काय म्हणाले?

मनोहर जोशी यांनी पहिल्यापासून शिवसेनेत असल्याचं म्हटलं होतं. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्यानं उभा आहे, असं त्यांनी म्हटलं. माझ रक्त शिवसेनेचं असून अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास आणि आता उद्धव ठाकरेंचा सहवास, मी महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी आहे, असं मनोहर जोशी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते.

केवळ इतक्या रुपयांत अपडेट होतं आधार कार्ड, तुम्ही अधिक पैसे तर देत नाही?

मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री

शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा १९९५ मध्ये आलं होतं. त्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडं होतं. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना संधी देण्यात आली होती. मनोहर जोशींनी पुढे लोकसभा अध्यक्षपद देखील भूषवलं. मनोहर जोशी सध्या शिवसेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम? राज्यपालांनी कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं निवेदन

मनोहर जोशी यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे आज त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे मनोहर जोशींच्या प्रकृतीची विचारपूस करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, अशी माहिती आहे.

राज ठाकरेंचा आदेश, वसंत मोरेंच्या पुण्यातील खंद्या समर्थकाची पदावरून हकालपट्टी

Source link

Eknath ShindeMaharashtra politicsmaharshtra latest newsmanohar joshiMumbai news todayUddhav ThackerayUddhav Thackeray news
Comments (0)
Add Comment