रोहित पवारांच्या पुढाकारानं आत्मक्लेश आंदोलन, चर्चा मात्र ७२ वर्षीय आजींच्या शिवप्रेमाचीच

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी एकच संतापाची लाट उसळली असल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त राजकीय पक्ष नाही तर प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात तो संताप असल्याचे पाहायला मिळत आहे. याच एक उदाहरण आज आमदार रोहित पवार यांनी केलेल्या श्रीक्षेत्र वढू येथे आत्मक्लेश आंदोलनादरम्यान पाहायला मिळाले. हे आंदोलन सुरू असताना एक ज्येष्ठ महिला आंदोलनात सहभागी झाली होती. दोन तास एका जागेवर बसून ती या आंदोलनाला पाठिंबा देत होती. त्यामुळे या दरम्यान चर्चा फक्त या आजींची झाली. ७२ वय असलेल्या कौशल्या पंडितराव यशवंत या आंदोलनात चर्चेचा विषय ठरल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आक्रोश मेळावा घेतला. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि अपमान करणाऱ्या व्यक्तींची हकालपट्टी करा, असेही त्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आत्मक्लेश आंदोलन करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्याचप्रमाणे भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंगल प्रभात लोढा यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

क्रिकेटमध्ये झाला सुपर रेकॉर्ड; १४५ वर्षात एकाही फलंदाजाने असा डबल विक्रम केला नाही

या वक्तव्याचा निषेध फक्त राजकीय नेतेच नाही तर सामान्य जनता देखील या आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून करत असल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांवर नित्य भक्ती असणाऱ्या कौशल्या आजी संपूर्ण आत्मक्लेश आंदोलन होईपर्यंत एका जागेवर छत्रपती शिवरायांचा नमन करताना पाहायला मिळाल्या.यावेळी त्यांनी ज्या कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत बोललं असेल त्यावर शासन झालंच पाहिजे, अशा भावना या आजींनी यावेळी व्यक्त केली. लहान पणापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पाहत आलो, ऐकत आलो. त्या रयतेच्या राजा बद्दल कुणी, असे बेताल वक्तव्य करत असेल तर त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. मी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी या आत्मक्लेश आंदोलन सहभागी होण्यासाठी आली आहे. मी येथील स्थानिक रहिवासी आहे, असं त्या म्हणाल्या.

जीएसटी विभागाची मोठी कारवाई; करचोरांच्या रॅकेटचा पर्दाफाश, हाती आले मोठे घबाड

या आत्मक्लेश आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार सहभागी झाले होते. आमदार रोहित पवार, अशोक पवार, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अतुल बेनके या सह आदी आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यांच्यात या आजीबाई देखील सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे सद्या सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगू लागली आहे.

रोहितसेना धोनीच्या काळातील पराभवाचा वचपा काढणार, टीम इंडिया बांगलादेशचा हिशोब चुकता करण्यास सज्ज

Source link

Amol MitkariBhagat Singh Koshyarichh sambhaji maharajkaushlya panditraoncp newsPune latest newsrohti pawarvadhu bk
Comments (0)
Add Comment