ठाकरे-आंबेडकरांची १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भेट, सेना वंचितची चर्चा पुढं जाणार?

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उद्या दुपारी १२ वाजता बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. उद्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात प्राथमिक चर्चा होईल, अशी माहिती आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर प्रबोधनकार. डॉट. कॉम या वेबसाईटच्या रीलाँचिंगच्या निमित्तानं एकत्र आले होते. उद्धव ठाकरेंनी देशातील सध्याच्या राजकीय स्थितीचा दाखला देत लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, असं म्हणत वंचित सोबत आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. यानंतर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत आघाडीसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, वंचितनं महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

ठाकरे आंबेडकर भेटीत नवं समीकरण निर्माण होणार?

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर उद्या मुंबईत एकत्र येणार आहेत. या भेटीत दोन्ही पक्षाच्या आघाडीसंदर्भातील चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांचं एकमत झाल्यास आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाचा उदय होईल.

जिंकता जिंकता भारतीय संघ हरला… बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने टीम इंडियाला दिला धक्का

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत सकारात्मक निर्णय झाल्या. राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास शिंदे फडणीवस यांची चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट वंचित सोबत राजकीय आघाडी करताना महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

पराभवानंतर भारतीय संघाला बसला अजून एक मोठा धक्का, वनडे मालिकेतून दिग्गज खेळाडू संघाबाहेर

वंचित बहुजन आघाडीनं गेल्या लोकसभा निवडणुकीत ४२ लाखं मतं मिळवली होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार दुसऱ्या स्थानी होते. त्यामुळं वंचितचा जसा शिवसेना ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो. त्याच प्रमाणं शिवसेनेच्या मतांचा देखील वंचितला फायदा होऊ शकतो. मात्र, उद्या होणाऱ्या बैठकीत काय घडणार यावर दोन्ही राजकीय पक्ष पुढील वाटचाल सोबत करणार का हे स्पष्ट होईल. वंचितसोबत आघाडीचा फायदा ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीत देखील होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

फडणवीसांनी दीडशेच्या स्पीडने गाडी पिटाळली, ५२९ किलोमीटरचं अंतर पावणेपाच तासात कापलं

Source link

Prakash Ambedkarsanay rautShivsenaSubhash DesaiUddhav Thackerayvba newsउद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरसंजय राऊतसुभाष देसाई
Comments (0)
Add Comment