पुण्यातील पर्यटक दापोलीत फिरायला गेला, कपड्यांना वाळू लागली म्हणून समुद्रात धुवायला गेला आणि…

दापोली :पुणे येथील काहीजणांचा ग्रुप पर्यटनासाठी दापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनारी आला होता. यावेळी पुणे येथील मयूर चिखलकर (२७) याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे परिसरातील ऐकूण सतरा मित्र आज रविवारी सकाळी ८ वाजता पर्यटनासाठी लाडघर येथे पर्यटनासाठी आले होते. ९ वाजण्याच्या सुमारास ते समुद्रात पोहायला गेले होते. १० वाजता ते पाण्यातून बाहेर आले व त्यांनी नाष्टा केला. मयूर चिखलकर (२७) हा दुपारी सव्वातीनच्या सुमारास कपडयाना वाळू लागल्यामुळे ती धुण्यासाठी एकटाच समुद्राच्या पाण्यात गेला. बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. मित्र थांबले होते.

मयुर बराच वेळ न आल्याने रुपेश गाडे हा त्यांचा मित्र मयुरला शोधायला किनाऱ्यावर गेला. त्याला मयुर वाळूवर पडलेला दिसला. त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होता. रुपेशने सर्व मित्रांना तेथे तात्काळ बोलावले. मित्रांनी मयुरचे पोट दाबून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

क्लिक करा आणि वाचा- लोहगडावर फिरणे पडले महागात!, पेण येथील विद्यार्थ्यांची बस ४० फूट खोल दरीत कोसळली

या मित्रांनी जवळ हॉस्पिटल कोठे आहे याची विचारणा तेथील ग्रामस्थांकडे केली. त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची माहिती मिळाल्यावर त्यांनी मयुरला गाडीतून उपजिल्हा रुग्णलयात आणले. तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतम राऊत यांनी तपासून मयुरला मृत घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा- अमरावतीत १०० हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा, अचानक होऊ लागल्या उलट्या, अतिसाराचा त्रास

मृत्यूचे कारण अस्पष्ट

दरम्यान, अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल मिळल्यावरच ते कळू शकणार आहे. जयेश वाडेकर यांनी यासंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अजित गुजर करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री बनण्याची हौस फिटली आणि…; महिला मुख्यमंत्री करण्यावरून चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर निशाणा

Source link

dapoliDeath of a TouristDeath of a Tourist in DapoliPuneRatnagiri newstourismदापोलीपर्यटनपुणेलाडघर समुद्रकिनारा
Comments (0)
Add Comment