परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पोखर्णीतांडा येथे एक महिला रात्री आपल्या घरामध्ये असताना शेजारी राहणारा एक पन्नास वर्षीय पुरुष महिलेच्या घरामध्ये घुसला. जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर महिलेने जिंतूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास जिंतूर पोलिसांकडून केला जात आहे. शेजारी राहणाऱ्या पुरुषाने घरात घुसून महिलेवर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
परभणी: गावातील तरुण सकाळी सकाळी घरात घुसला अन् महिलेच्या बाजूला जाऊन झोपला…
दरम्यान मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलगी मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करत असताना कॉफी शॉपमध्ये येऊन एका तरुणाने त्या मुलीला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. अशातच सदरील घटना समोर आल्याने परभणीमध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस प्रशासनाने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
कॉलेजचे तरुण-तरुणी कॉफी शॉपमध्ये गेले; बाहेरून पाहताच अश्लील चाळे उघड झाले अन्…