महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच सीमावाद चिघळू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुढील रणनीती आखणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिनी नेमलीय. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केलं होतं. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असं आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.
अक्कलकोटमध्ये कन्नड भवन उभारण्यासाठीच्या हालचालींना वेग, या दोघांनी दिली मोठी
उद्योगमंत्री उदय सामंत आज दौऱ्यावर जाणार
महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद तापला असताना उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सामंत हे सीमाभागातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तिकोंडी, उमदी आणि माडग्याळ येथील ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माडग्याळ, व्हसपेठ आणि तिकोंडी येथील तलावांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी १ वाजता ते गुड्डापूर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
तणावामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील बससेवा बंद, सीमावादामुळे बसेस