लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप; मुलगा नसल्याने चारही मुलींनी दिला खांदा अन्…

बुलडाणा : मनुष्य जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य अतिशय दुःख आणि वेदनादायी म्हणावे लागेल. जेव्हा रूढी परंपरेला फाटा देत आपल्याला आपल्या जन्मदात्या वडिलांना अंतिम प्रवासाकरता आपला खांदा द्यावा लागतो तेव्हा ती व्यथा शब्दात व्यक्त होत नाही. असाच काहीचा प्रसंग बुलढाणा जिल्ह्यातील भादोला येथील एका कुटुंबावर आला. परिवारात मुलगा नसल्याने चारही मुलींनी आपल्या वडिलांचा संपूर्ण क्रियाकर्म रितीरिवाजाप्रमाणे पार पाडले. पुरुष प्रधान संस्कृतीस फाटा, चार मुलींचा पार्थिवाला खांदा दिला. लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप दिला.

मुलगा नसल्यामुळे त्यांच्या ४ मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देत एक वेगळा पायंडा पाडला. बुलडाणा तालुक्यातील भादोला गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला.

वाचा- आता राहुल द्रविडची उचलबांगडी निश्चित, BCCI घेणार कठोर निर्णय

ग्राम शेतकरी सोसायटीचे सचिव म्हणून काम करणारे पुंजाजी तुकाराम खडेकर यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या ४ मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. यावेळी उपस्थित नातेवाईकांसह गावकऱ्यांचे डोळे पाणावले. जिवापाड प्रेम असलेल्या पित्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या चौघींनी गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराची तयारी केली.

वाचा- क्रिकेटमध्ये झाला सुपर रेकॉर्ड; १४५ वर्षात एकाही फलंदाजाने असा डबल विक्रम केला नाही

आशा जाधव, उषा चव्हाण, वर्षा भोंडे, मनीषा भोसले या ४ मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. तोपर्यंत स्थितप्रज्ञ राहून संयमाने सर्व तयारी केली. चिता धडधड पेटल्यावर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला! त्यांनी हंबरडा फोडत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. यामुळे सर्वांचे डोळे पाणावले होते.

Source link

Buldana Newsemotional storygirls gave shoulder fathers funeralबुलडाणाबुलडाणा बातम्या
Comments (0)
Add Comment