Eastern Expressway Traffic: मेट्रोच्या कामामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर या वाहतूक कोंडीचा अनुभव आला. सकाळच्या वेळेत कमी गर्दी असूनही या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. त्यानंतर पिक अवर्स सुरु होऊनही हे काम संपले नव्हते. या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली.
हायलाइट्स:
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्याही मोठी आहे
- या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखीनच वाढला आहे
काहीवेळापूर्वीच मेट्रोच्या गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही तासांमध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी अनेक तास जाणार आहे. परिणामी आणखी काही तास या मार्गावर वाहतूक कोंडी राहणार आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखीनच वाढला आहे. अशातच मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकडे निघालेल्या चाकरमन्यांना आणि सामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.