कोकणात ‘खट्ट’ झालं, तरी मला मुंबईत ‘धडाम’ आवाज येईल, राज ठाकरेंनी खडसावलं

रत्नागिरी : मला एकदा महाराष्ट्रातील सत्ता हातात द्या, मग महाराष्ट्र कसा करतो पहा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरे बोलत होते.

कोकणात खट्ट जरी झालं, तरी मला त्याचा धडाम असा आवाज मुंबईत येईल, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. कोकणातल्या जनतेची देहबोली ही आशादायक आहे. कोकणातले प्रश्न अद्याप जैसे थेच आहेत. मला तन मन धन देऊन काम करणारी माणसं हवी आहेत, स्वतःहून पुढे या, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

कोकणात असे अनेक पदाधिकारी आहेत, त्यांना काम करायचं आहे, पण त्यांना काही लोक काम करु देत नाहीत, या सगळ्यांना बाहेर काढणार, मला सगळे कोकणातले रिपोर्ट मिळतील, पुढच्या १५ दिवसात योग्य तो बदल करणार, असा सज्जड दम राज ठाकरेंनी दिला.

महाराष्ट्रातील चार भारतरत्न एकट्या दापोलीतील आहेत,पण काही आहे का त्याचं महत्त्व? त्यांनी दिलेल्या विचारांचा अभ्यास करा, आपल्या या तालुक्याचं महत्त्व इथल्या पदाधिकाऱ्याला माहिती पाहिजे, जुन्या लोकांना घरून कामासाठी बाहेर काढा, काम करू द्या त्यांना, असं राज ठाकरे म्हणाले. मला एकदा महाराष्ट्रातील सत्ता हातात द्या, मग महाराष्ट्र कसा करतो पहा, असंही राज यावेळी म्हणाले.

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली. राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत कोकणात येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल कशी असेल, याचे स्पष्ट संकेत दिले. पक्ष बांधणीच्या आड दुसरा पक्ष आल्यास त्यांना तुडवा आणि पुढे जा, असे स्पष्ट आदेशच राज ठाकरे यांनी कोकणात काढले आहेत.

हेही वाचा : काही लोकांना कोकण मागास ठेवायचाय, पण आम्ही रिफायनरी उभारूच: देवेंद्र फडणवीस

येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो, की कुणी हात लावू शकणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. बरं झालं मी कोकण दौऱ्यावर आलो म्हणून मला काही गोष्टी कळल्या, मुंबईत एका पक्षाचं काम करायचं, गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचं काम करायचं, ही भानगडच आता ठेवणार नाही मी, असं राज ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा : विकेट नाही घ्यायची, नवनीत राणा राजकारणाच्या आखाड्यातून थेट क्रिकेटच्या पीचवर

Source link

Maharashtra Navnirman SenaMaharashtra Political Newsraj thackerayraj thackeray dapoli speechraj thackeray konkan tourमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरेराज ठाकरे कोकण दौराराज ठाकरे दापोली भीषण
Comments (0)
Add Comment