Border Dispute: …नाही तर मला कर्नाटकात यावे लागले संभाजीराजेंचा इशारा; कोगनोळी नाक्यावर प्रचंड तणाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव परिसरात महाराष्ट्राची वाहने फोडल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत महामार्गावरून बेळगाव भागात घुसण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अडवले. दरम्यान, बुधवारी कर्नाटकात सौंदत्ती यात्रा आहे, त्याला कोल्हापुरातील लाखावर भाविक गेले आहेत, त्यांना संरक्षण द्या, नाही तर मला तेथे यावे लागेल असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला असताना कन्नड वेदिका रक्षक संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष्य करत अनेक वाहने फोडली. यामुळे त्याचे संतप्त प्रडसाद सीमाभागात उमटले. गेले आठ दिवस कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा आहे. दोन हजार पोलिस तेथे आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांना पुढे सोडणे बंद केले आहे. यामुळे कर्नाटकात जाऊ इच्छिणाऱ्या मराठी बांधवाची मोठी अडचण होत आहे.
महाराष्ट्राची वाहने फोडल्याचे कळतातच कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला.

वाचा- पवारांनी कर्नाटकला दिलेल्या इशाऱ्यानंतर चर्चेत आली ती १९८६ घटना; बेळगावात घुसून केले होते…

जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचले. तेथे कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक सरकार तसेच महाराष्ट्राचे समन्वयक चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा निषेध करत बांगड्यांचा आहेर देण्याचे आंदोलन केले. त्यांच्या प्रतिमेला बांगड्याचा आहेर देण्यात आले. नाक्यावर तणाव निर्माण झाल्याने कागल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुरगूड येथे बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कर्नाटक पोलिसांनी कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्यासाठी पाचला पन्नास वाहने फोडण्यात येतील.

– संजय पवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना

सौंदत्ती यात्रेचा बुधवारी मुख्य दिवस आहे. कोल्हापुरातील लाखावर भाविक तेथे पोहोचले आहेत. सीमावाद चिघळल्याने त्यांना धोका पोहोचू नये म्हणून तातडीने कर्नाटक सरकारने संरक्षण द्यावे अशी मागणी कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. यामध्ये वसंत मुळीक, गुलाबराव घोरपडे, बबन रानगे यांचा समावेश होता. दरम्यान, संरक्षण न दिल्यास मला कर्नाटकात यावे लागेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

वाचा- दुसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला बसला मोठा झटका; संघात करावा लागेल बदल, पाहा कोणाला…

एस. टी. सेवा बंद

महाराष्ट्रातून निपाणी मार्गे कर्नाटकात जाणारी महाराष्ट्राची एस.टी. बस सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे दिवसभर सहाशेवर फेऱ्या रद्द झाल्या. सांगली, सोलापूर मार्गे कर्नाटकात जाणारी सेवा मात्र सुरू आहे. कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रात येणारी त्यांची एस. टी. सेवा बंद केली आहे.

वाचा- कर्नाटकनं हे सर्व थांबवावं, क्रियेला प्रतिक्रिया नको,सीमाप्रश्नी अमित शाहांसोबत बोलणार : देवेंद्र फडणवीस

पर्यायी मार्गाने वाहतूक

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील वाहनांना कोगनोळी नाक्यावर अडविल्यानंतर अनेक वाहने कापशी मार्गे पुढे जात आहेत. दरम्यान, एकवीस सीमा नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Source link

devotees demand protectionmaharashtra karnataka border disputetwo lakh devotees in karnatakaमहाराष्ट्र कर्नाटक सीमावादसंभाजीराजेसौंदत्ती यात्रा
Comments (0)
Add Comment