शरीरसंबंधाच्या आमिषाने पुणेकराला ब्लॅकमेल, १९ वर्षीय तरुणीसह चौघं पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : शरीरसंबंधाचे आमिष दाखवून पुण्यात ५० वर्षीय नागरिकाला ब्लॅकमेल करण्यात आले. इतकंच नाही, तर त्याच्याकडून ९३ हजार रुपये उकळले. हा सगळा प्रकार महाविद्यालयातील मुलांनी केला असून यामध्ये एका तरुणीचाही मुख्य सहभाग आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुण आणि एका तरुणीला अटक केली आहे.

या प्रकरणी धीरज वीर (वय 19 रा .प्रतीक नगर येरवडा), जॉय किरण मंडळ (वय 19 रा. श्रीनाथ नगर घोरपडी पुणे), एक अल्पवयीन तरुण आणि कांचन उर्फ डिंगी (वय 19 रा. टिंगरेनगर लेन नो 14) यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५० वर्षीय व्यक्तीची फिर्याद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरसंबंध ठेवण्याच्या आमिषाने पैसे देऊन तीन ते चार वेळा फिर्यादीने आरोपी तरुणीसोबत शरीर संबंध ठेवले. शरीर सबंध ठेवत असताना आरोपीला लक्षात आले की फिर्यादीकडे अमाप पैसे आहे. म्हणून आरोपी तरुणीने शक्कल लढवत तीन मित्रांसोबत संगनमत करून फिर्यादीला लुटण्याचं ठरवलं.

शरीर संबंधसाठी फिर्यादीला डी वाय पाटील कॉलेज या ठिकाणी बोलवलं. फिर्यादी आपली चारचाकी कार घेऊन डीवाय पाटील कॉलेज येथे आला असता, तरुणी व तिच्या मित्रांनी फिर्यादीच्या गाडीवर ताबा घेतला. त्याच चारचाकीमध्ये बसून फिरत असताना फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ करत हा सगळा प्रकार तुझ्या पत्नीला सांगू अशी धमकीही देण्यात आली.

फिर्यादीला बंड गार्डन येथे एचडीएफसीच्या एटीएममध्ये आरोपी घेऊन गेले आणि २५ हजार रोख रक्कम काढून घेतली. यावरही आरोपी थांबले नसून फिर्यादीकडून वारंवार पैसे उकळत होते. १० नोव्हेंबर रोजी २० हजार रुपये, १५ नोव्हेंबर रोजी तीन हजार रुपये, ३ डिसेंबर रोजी १५ हजार रुपये, असं करुन फिर्यादीकडून तब्बल ९३ हजार रुपये उकळण्यात आले. ही रक्कम घेतली असतानाही आरोपींनी ५ डिसेंबर रोजी अजून पैशांची मागणी केली.

हेही वाचा : वॉशिंग मशीनवरून झालेला वाद टोकाला; दोन भाऊ शेजारणीवर धावून गेले; भांडणाचा भयंकर शेवट

या प्रकरणी फिर्यादीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दत्तात्रय भापकर यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या टीमने ट्रॅप लावत पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या अधिक तपासामध्ये एका १९ वर्ष महिला आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : सद्दामचा फॉर्म्युला, अरोरावरुन प्रेरणा, फिल्मी स्टोरीलाही लाजवणारा काजल-हितेशचा कट

Source link

maharashtra crime newsMaharashtra news todaypune blackmailPune crimepune old man blackmailपुणे गुन्हे बातमीपुणे ज्येष्ठ नागरिक ब्लॅकमेलशारीरिक संबंध
Comments (0)
Add Comment