सीमवादाचे सोलापुरात तीव्र पडसाद; कर्नाटकच्या बसेसना फासले काळे, वाहक-चालकांचा केला सत्कार

सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसत आहे, कर्नाटक सीमेजवळील या वादाची तीव्रता अधिक जाणवते आहे. सोलापुरात ही वाद पेटला असून सोलापुरात आलेल्या कर्नाटकच्या बसेस अडवून काळे फासले जात आहे. सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक झाली असून कर्नाटक सरकारच्या बसेस किंवा अन्य वाहने आल्यास ती फोडण्यात येतील असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात कर्नाटकमधील बसला अडवून ‘जय महाराष्ट्र, जय प्रहार’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिले

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्य शासनाच्या बसेस येत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या बसेस व वाहनांवर बेळगाव भागात हल्ले झाले. त्या घटनांच्या निषेधार्थ आज (बुधवार, ७ डिसेंबर २०२२) रोजी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सात रस्ता येथूनच कर्नाटक रोडवेच्या बसेस जातात. त्या बसेसना अडवून प्रहार संघटनेने वाहक व चालकाचा हार घालून सत्कार केला.

क्लिक करा आणि वाचा- ‘कुठे आहे सरकार, कुठे आहेत मंत्री?’; मुंबईतील प्रदूषित हवेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

आज फक्त एसटी बसेसला काळ फासण्यात येत आहे ,उद्या पासून या बसेस सोलापूर किंवा महाराष्टात दिसतील तर त्याला फोडण्यात येतील असा इशारा अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मणियार, संदीप तळेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

अचानकपणे कर्नाटक बसेस रस्त्यावर अडविल्याने पोलिसांची तारांबळ

सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात कर्नाटक बसेस रस्त्यावर अडवून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. कर्नाटक राज्यातील बसेसमधील ड्रायव्हर, वाहक,आ णि इतर प्रवाशी हे घाबरले होते. त्यावेळी त्यांना कोणतीही इजा पोहोचविणार नाही असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी दाखवला.

क्लिक करा आणि वाचा- राधाकृष्ण विखे पाटील- थोरातांमधील संघर्ष पुन्हा पेटला; बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले…

यावेळी बसेसला काळे फासून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा देत उद्या पासून कर्नाटकच्या बसेस फोडल्या जातील असा इशारा या आंदोलनादरम्यान प्रहार संघटनेने दिला.

क्लिक करा आणि वाचा- सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल

Source link

Border disputekarnataka buses spray black paintmaharashtra karnataka border disputeजय महाराष्ट्र जय प्रहारप्रहारमहाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न
Comments (0)
Add Comment