आमच्या मागण्या मान्य करा, महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाऊ, पत्नी पीडित संघटनेचा इशारा

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावं विकासकामं न झाल्यास कर्नाटकमध्ये जाऊ इशारा देतात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी देखील कर्नाटकात जाऊ असं म्हटलं. नांदेडच्या काही गावांनी तेलंगाणामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमधील चार गावांनी मध्य प्रदेशमध्ये तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गावांनी गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. या सर्व गावांची प्रमुख समस्या ही विकासकामं होत नसल्याचं म्हटलं होतं. विकासकामांच्या मागणीसाठी गावांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला होता. आता, आणखी एका संघटनेनं राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र सरकारकडे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, सरकार लक्ष देत नाही.आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाऊ, असा इशारा पत्नीपीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनी दिला आहे.

पत्नी पीडित पुरुष ही संघटना पुरुषांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात आवाज उठविते. या संघटनेचा औरंगाबाद नजिकच्या करोडी शिवारात एक आश्रम देखील आहे. या संघटनेकडून वेळो वेळी अनेक आंदोलने करण्यात येतात. पिंपळ पूजा अशी विविध आंदोलने पुरुषांच्या हक्कासाठी करण्यात येतात.यामुळे ही संघटना नेहमीच चर्चेत असते. या संघटनेकडून एक अनोखी मागणी गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. यासाठी ते वेळोवेळी आंदोलन करत असतात.

‘दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली’, अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप

महिलांवर अत्याचार झाल्यास पीडित महिला ही महिला आयोगाकडे दाद मागते. मात्र, जेव्हा पुरुषांवर अत्याचार,अन्याय होते तेव्हा त्यांना दाद मागण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ नाही. त्यामुळे महिला प्रमाणे पुरुषांचा देखील आयोग स्थापन व्हावा, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात येत आहे.

सीमावादाचे पडसाद संसदेत; खासदार आक्रमक, सभापती ओम बिर्ला यांच्या या विधानाने आश्चर्य

गेल्या सात वर्षापासून पत्नी पीडित पुरुष संघटनेकडून ही मागणी करण्यात येत आहे.मात्र, या मागणी कडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनी एक व्हिडिओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत फुलारे म्हणतात आमच्या मागण्या गेल्या सात वर्षांपासून पूर्ण होत नाहीत. जर मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही महाराष्ट्र राज्य सोडून कर्नाटक राज्यात जाऊ, असा इशारा फुलारे यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून दिला आहे.

श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरत रचला मोठा विक्रम, एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही

Source link

aurangabad newsaurangabad news updatebharat fularebharat fulare newsmaharashtra karnataka border issueMaharashtra newsMarathi Breaking Newsmarathi news today
Comments (0)
Add Comment